पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७४ संगीत शिवलीलामृत पद. (कांते फार तुला मज साठी,) या चालीवर. मम प्राणविसावे मृगनयने संकट मज पडलें ॥ पितृसदानं गे जाण्याचा तव नेम बघुनि, मम मन गडबडलें ॥ ४० ॥ तव पिता तरि तो निंदक मोठा ॥ मम द्वेषी तो दुर्जन खोटा ॥ पिता नव्हे तो शत्रू समजे ॥ जातां तुजला निंदिल पहिले ॥ १॥ . साकी. यापरि दोघे बोलत असतां नारद तेथे आला ॥ पितुगहाला जाण्याला गे मान कशाला तुजला ॥ ऐकुनि वचनाला ॥ होई तोषाच गौरीला ॥ १ ॥ बसली मग ती नंदीवरती भूतगणाला संगें ॥ घेउनि अंबा निघती झाली आली सदना वेगें ॥ पाही मंडप तो ॥ सुरवरे भरलासा दिसतो ॥ २ ॥ सन्माने ते देव बसविले त्यांच्या पूज्य स्थानीं ॥ ऋषीसुरवरा भावे पूजी एक वेगळां करुनी ॥ उडगणिं चंद्र जसा ।। मधे शोभतो दक्ष तसा ॥ ३ ॥ शिवद्वेषि तो दक्ष टाकितो कुंडी अवदाने ती ॥ भवानि जवळी आली तेव्हां सुरवर तोषित होती ॥ .. धूर नेत्रिं भरला ॥ नाही दिसले दक्षाला ॥ ४ ॥ दिंडी नंदिवरूनि उतरुनी समिप गेली ॥ वदन मुरडी भूमीस ग्रंथि घाली ॥ जगन्माता निरखुनी वदन पाही ॥ परी दक्षाने पाहिलेच नाहीं ॥ १ ॥ धम्र भरला नयनांत फार पाही ॥ ह्मणुनि जनकाला काहिं दिसत नाहीं ॥ असें जाणुनि नीट ती आंत गेली ॥ सकळ भगिनींच्या जवळ उभी ठेली ॥२॥ सकळ भगिनींचा मान करी माता ॥ ह्मणुनि पाही तिजकडे जगन्माता ॥ परी बोलेना जननि बोल कांहीं ॥ असें देखुनि स्तब्ध ती उभी राहीं ॥ ३ ॥