पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय तेरावा. दिंडी. नीर वाहे मस्तकीं सदोदीत ॥ भक्त देखुनि आनंद त्यास होत ॥ कीर्तनी तो जाउनी नाचु लागे ॥ भक्त देखुनि सर्वही देइ वेगें ॥ १ ॥ थोर लहान ना कळे त्यास कांहीं ॥ बैल वाहन हो त्यास तरी पाही ॥ अशा मूर्तीला कोण ह्मणे देव ॥ मूर्ख लोकचि ते ह्मणति त्यास पाव ॥ २॥ शंभु निंदा ती करावया पाही ॥ भेट घ्यावी इच्छुनी जाय तोही ॥ . दक्ष कैलासा एकवार गेला ॥ शंकरानें नाहींच मान केला ॥ ३ ॥ ( जाऊ नकारे विषयाटविची, ) या चालीवर. या या परिने दक्ष निंदि हो गिरिजारमणाला ॥ या न पूजी विभाग कांहीं देई नच त्याला ॥ ५० ॥ आयुष्याची अवधी पुरली धरी कुबुद्धीला ॥ शिवभजन जो न करी पापी विनें बहु त्याला ॥ जप तप दानहि व्यर्थ परी तें न भजे शंभूला ॥ बहुत निर्दय दुर्जन खळ ते निंदिति ताताला || चांडाळासम समान त्यांना, जपा विटाळाला ॥ १ ॥ श्लोक दाक्षायणी ती बहु वाट पाही ॥ बोलावणे कां मज येत नाहीं ॥ तातगृहीं यागचि होत आहे ॥ आश्चर्य वाटें मजला तरौ हें ॥ १ ॥ पद ( श्रीहरिच्या वेणु नादें ) या चालीवर. गिरिजा ती विनवि नाथा आज्ञा द्या झडकरी ॥ जातें मी तात गेही यागाते तो करी ॥ आणी तो सर्व कन्या मानाने त्या तरी ॥ विसर का त्यास झाला मजविषयीं अंतरीं ॥ जातें मी प्राणनाथा बोले तो त्यावरी ॥१॥ सार्वजनिक