पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७२ ___ संगीत शिवलीलामृत, अध्याय १३ वा. श्लोक जगद्गुरु जगत्पती अखिल ह्या जगीं तूंच रे ॥ तुझे चरण पाहणे सतत ही मनीं आस रे ॥ गजास्यजनका उमाहृदय तूं हरा ईश्वरा ॥ मनोरथ तरी कधीं पुरविशी प्रभो शंकरा. ॥ १ ॥ साकी. सूतवदात हो शौनकऋषिला एक कथा जी घडली ।। त्रेतायुगिं त्या अद्भुत मोठी दक्षाच्या त्या वेळी ॥ ऐका ती सगळी ॥ कळविन तुह्मां या वेळीं ॥ १ ॥ पद ( दो दिवसाची तनु ही साची, ) या चालीवर. दक्ष प्रजापति पवित्र मोठा आरंभी गहिं सत्रचि हो ॥ पाचारी तो सर्व अमर परि देई सोडुनि शंकर हो ॥ धृ० ॥ ज्याला वंदिति इंद्र विधि हरी वेदहि ज्याची स्तुती करी ।। शिवमहिमा तो नेणुनि चित्तीं निशिदिनिं निंदी दक्ष तरी ॥ अपवित्र किती ह्मणुनी सांगू नरमुंडाची माळ करी ॥ गजचर्मचि ते, तें ही ओलें नाहीं खंती त्यास तरी ॥ नरमस्तक तें घेउनि हाती भिक्षा मागें घरोघरीं ॥ स्मशान ज्याचे वसतीस्थानचि चिताभस्म तो लावि शिरीं ॥ भूषण पाही विखार देहीं भुतें तयाच्या बरोबरी ॥ अभद्र तितकें याने वरिलें देव नव्हे तो खरोखरी ॥ त्रितीय नेत्री प्रळयाग्निचि तो वाटे त्रिभुवन जाळिल हो । दैत्य माजवी वर देऊनी बैसे देउनि सर्वचि हो ॥ १ ॥