पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. साकी. अष्ट भैरव अवतार तरि ते झाले प्रसिद्ध पाहीं ॥ असित, अंगार, चंडक्रोधही, उन्मत कपाल, हे ही ॥ भीषण, सहवा तो ॥ संहार भैरव शेवटि तो ॥ १ ॥ • असुर वधिला ही मात प्रगटतांच ॥ तिन्ही लोकी आनंद माइनाच ।। हस्त धरुनी ते उमारमानाथ ॥ मिळुनि दोघे कैलासनगी येत ॥ १॥ अंबिका ती तत्काल प्रगट झाली ॥ हरिहराते साष्टांग नमन घाली ॥ दोन मूर्ती बैसवी आसनी हो ॥ प्रथम पूजा मग करीं प्रार्थना हो ॥ २ ।। . पद. ( सुंदर मुख तुंदिल तनु, ) या चालीवर. हरिहरहो नारायण नागभूषणा ॥ शिवसीतावल्लभहो शांत सद्गुणा ॥ पंचवदन फणाशयन नाम निर्गुणा ॥ नीलकंठ निलवर्ण तापनाशना ॥ विश्वनाथ विश्वंभर असुर मर्दना ॥ विष्णू, स्थाणू, वणू, ॥ तव महिमा त्रिविक्रमा ॥ हे त्रिलोचना ॥ १॥ . .. पद. ( बघुनी उपवना, ) या चालीवर कमलोद्भवपिता कपुरगौरा पिनाकपाणी हरा ॥ पीतांबरधर गोवाहन हर गोविंदा रमावरा ॥ वृंदारकपाते वृंदानीहो भोगिसि बहु सुंदरा ॥ चंद्रशेखरा चक्रवरा तूं शंखहि शोभे करा ॥ कपालनेत्रा कमनियगात्रा भक्तां बहु आसरा ॥ मुरहर मायामल्लहरा तरि पाव मला शंकरा ॥ अधकमदेना अघवकहरणा भक्ताला उदरा ॥ सिंधुजावरहि सिद्धेश्वर तूं हे अगतनयावरा ॥ नंदकिशोरा निःसंसारा पावे मज ईश्वरा ॥ चाल ||