पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय बारावा. १६९ तो किरे ॥ पति सहीत कारन नृत्य एक दिवसरे ॥ नियम पूर्ण होय वरी लग्न नाहिंरे ॥ चाल चाल नृत्य करूं वृक्ष जवळिरे ॥ ठेविन मी जेथं हस्त ठेव तेथंरे ॥ हाव भाव कारन जसे कर तसें त्वरें ॥ त्यांत कांहिं न्यून होय क्षोभे देवरे ॥ दैवत मम क्रुद्ध बहू पृथ्वि जाळिरे ॥ १ ॥ साको राक्षस बोले करीन तैसें जैशी आज्ञा करशी ॥ ऐसा भुलवुनि वटछायेशी आणी सत्वर त्यासी ॥ नमुनी देवाला ॥ आरंभी मग नृत्याला ॥ १ ॥ पद. (घेउनि मुशाफर वेश, ) या चालीवर. अष्टनायका तटस्थ होती पाहुनि नृत्यांतरी ॥ किन्नर गायक भुलून जाती गायन ऐकुनि तरी ॥ धृ० ॥ सर्व देव ते षट्पद होउनि रुंजी घालति वरी ॥ गुंजारव ते वरिवरि करिती पाहुनि ती सुंदरी ॥ ब्रह्मदेवही भुलून गेला शेषहि येई वरी ॥ जेथे ठेवी हस्त मोहिनी असुरहि तैसें करी ॥ ऐसें करतां मोहिनि ठेवी हस्त मस्तकावरी ॥ असुरहि ठेवी हस्त मस्तकी भस्म होय सत्वरी ॥ - मोहिनिरूपा त्यागुनि केशव स्वरूप धारण करी ॥ चाल ॥ बटुरूप सोडुनी शंकर प्रगटे तिथें ॥ हरिहरहि भेटले होति आनंदित ते ॥ पुष्पवृष्टि करिती वरिवरि सुरगण ते ॥ चाल ॥ मोहिनिरूपा पाहुनि द्रवले वीर्य शिवाचे तरी ॥ अष्ट भाग ते त्याचे झाले पडतां ते भवरी ॥ १ ॥