पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय बारावा. १६७ भक्तजन भयाभग जो करी ॥ लाघवी अती जाण तो तरी ॥ घोर काननी पळत चालला ॥ असुरहि तया पाठिं लगला ॥ ३ ॥ साकी .. अरे जोगड्या धीर धरीरे संहार तुझा करुनी ॥ या देहासी रक्षा लाविन श्रमूं नको बा पळुनी ॥ वेदहि ज्या नेणें ॥ असुर तयाला धरिन ह्मणे ॥ १ ॥ ब्रह्मादिक ते सर्व अमर ही ज्याला ध्याती नित्य ॥ सनकादिक ही पूजिति ज्याला धरिन ह्मणे त्या सत्य ॥ लागे त्या पाठीं ॥ शिरीं कर ठेवण्यासाठीं ॥ २ ॥ देखुनि जवळी हस्त पुढे तो धरण्यासाठी करितो ॥ हस्त न लागे त्याला परि हो पुन्हां दूर तो दिसतो ॥ धांवे सत्वर तो ॥ परि त्यास कसा सांपडतो ॥ ३ ॥ कोटी वर्षे धांवे ऐसा नाही हातां आला ॥ उणे पुरे ते शब्द बोलुनी हाका मारी त्याला ॥ शास्त्रहि ज्या नेणें ॥ असुरहि त्याला धरिन ह्मणे ॥ ४ ॥ पद. ( शिवाज्ञेचि वाट न पाहता,) या चालीवर. प्रेमळ भक्ता शुद्ध भाविका आहे तो विकला ॥ पार्वति सह तो गृहीं राहुनी सुखवी बहु त्याला ॥ धृ०॥ विद्येने वा तपोबलाने धरूं ह्मणति शंभूला ॥ अहंकारें भस्मासुर तो लागे पाठीला ॥ कैसा तरि तो तया सापडे नकळे मूर्खाला ॥ इकडे पार्वति स्तवू लागली लक्ष्मीरमणाला ॥१॥ पद. (शेष शयन कमल नयन, ) या चालीवर. कमलनयन कमलनाभ असुरमर्दना ॥ शेषशयन नित्य तुझे हे जनार्दना ॥ ॥धृ०॥ जगद्वंद्य जगद्याप धांव वामना ॥ कमलधारि उदधिवासि पतित