पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६ संगीत शिवलीलामृत. सर्वीसह मग नारायण तो ॥ शंभूजवळी आला ॥ . भस्मासुर तो मातुनि गेला त्रास देत सर्वाला ॥ सर्व भस्म केलें ॥ आतां कांहीं नच उरलें ॥ ४ ॥ उरलो आह्मीं समस्त सुरही करिल अंत तो अमुचा ॥ तुझे वराने मातनि गेला करिल अंत तव साचा ॥ गिरिजा जतन करी ॥ ऐकुनि हांसे मदनारी ॥ ५ ॥ . दिंडी मरण असुराचे जवाळे असें जाणा ॥ तुह्मीं जावें आपुल्या सुखें स्थाना ॥ असें बोले शंभु तो असुर आला ॥ भस्म घेउनि हातिं तो उभा ठेला ॥ १ ॥ काय कारण अमरास येथ याया ॥ येति गा-हाणे शिवा जवळि द्यायाः॥ सरड हालवि आपली मान जैशी ॥ तुकावितसे मान तो तरी तैशी ॥२॥ अमर जे जे पाहिले इथे जाण ॥ उद्यां त्यांचा घेईन खचित प्राण ॥ असें बोलुनि शंकरा जवळ गेला ॥ नित्य नियमाचे तो नसे भीति त्याला ॥३॥ साकी दुष्टा अधमा चांडाळारे शेवट कैसा केला ॥ पृथ्वीचा तो नाश कराया दिधला वर कां तुजला ॥ मरण समिप आलें ॥ ऐसें जाणाच या वेळें ॥१॥ आतां मजला तुझी सुंदरा दारा गिरिजा देई॥ नाही तर मी तुझ्या मस्तकी ठेविन कर या समयीं ॥ असुर असें बोले ॥ हांसे शंकर त्या वेळें ॥ २ ॥ कामदा (या चालीवर.) बोल ऐकुनी पार्वती सती ॥ चकित होउनी उठुनि गेलि ती ॥ असुर हालवी मान तिजवरी ॥ जिंकुनी शिवा नेत तज तरी ॥ १ ॥ शंभु मस्तकी ठेवण्या कर ॥ असुर धांवला फार सत्वर ॥ पाहुनी असा रोख तो तरी ॥ शंभु चालला पळत सत्वरी ॥ २ ॥ ॥