पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय बागवा. दिंडी. श्येनपक्षी तो अकस्मात येई ॥ इतर पक्ष्यांचा प्राण जसा घेई ॥ अंतरिक्षांतुन तशी धांव मारी ॥ हस्त ठेवुनि करि प्रजा भस्म सारी ॥ १ ॥ समरिं योद्धा जरि जिंकि कृतांताला ॥ असा योद्धा बलहीन तरी झाला ॥ जसा पाखांडी नावरे कुणाला ॥ तसें सर्वहि भीति त्या राक्षसाला || २ ॥ . श्लोक असुर करित चाले नित्य संहार ऐसा ॥ परि नच कळला त्या हा समाचार कैसा ॥ वरिवरि तरि जाई शंभुला भस्म देई ॥ शिवहरचरणाला लीन तो फार होई ॥ १ ॥ येई सवेची मग मृत्यु लोकीं ॥ इच्छा मनीं तो धरि सत्य ही की ॥ देवासही त्या शचिनायकाला ॥ जिंकीन मी मागुति अच्युताला ॥ २ ॥ कामदा ( या चालीवर.) करुनि भस्म त्या मागुती हरा ॥ हिरुन ध्यावि ती गौरि सुंदरा ॥ शंभु वृद्ध तो नावडे तिला ॥ ह्मणुनि ती भुले पाहुनी मला ॥ १ ॥ साकी पृथ्वी पडली उदास जेव्हां प्रजा ऋषी ही मिळुनी ॥ इंद्राला ते शरणाच गेले रक्षी रक्षी ह्मणुनी ॥ चरणी लागति ते ॥ ह्मणती रक्षा आह्माते ॥ १ ॥ सकळांसह तो मघवा जाउनि सांगि वृत्त हे विधिला ॥ क्षीराब्धीच्या जामाताला जाउं शरण ये वेळां ॥ ऐसें विधि बोले ॥ हेच योग्य हो या वेळें ॥ २ ॥ अक्षज नामहि इंद्रिय ज्ञाना ज्याने केले दमन ॥ .. अधोक्षज तरी नाम तयाला ह्मणूनि असें बा जाण ॥ जाउनि त्याजवळीं ॥ नमिती सारे त्या वेळी ॥३॥