पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६४ संगीत शिवलीलामृत वर द्यायासी सिद्ध पाहुनी गिरिजा बोले स्वामी ॥ परम नष्ट हा दुराचारि हो ऐका वदतें जें मी ॥ देता वर याला ॥ भस्म करिल हा जगताला ॥२॥ अंजनीगीत महा शब्द तो करावयाची ॥ हौस मनी हो फारचि साची ॥ फाल्गुन महिना आला तोंची ॥ इच्छा पुरवाया ॥ १ ॥ वाट लुटारू चोराला हो ॥ निरोप दिधला राजाने हो ॥ . स्त्रीराज्याचे प्रभुत्व तें हो ॥ दिधलें जाराला ॥२॥ दिंडी मर्कटाला दीधलें मद्य प्याया ॥ वाश्चकाने दांशली त्यांत कायाँ ॥ त्यांत संचरलें भूत तया देहीं ॥ काय सांगू अन्योन्य करी तो ही ॥ १ ॥ असुर तामसि हा वर न कदां द्यावा ॥ वरा देतां गांजील सर्व देवा ॥ वीरभद्रादिक सांगतात हेच ॥ नका देऊं हो अशा वरालाच ॥ २ ॥ साकी मूल तरी हे भस्मासुर बा द्यावा वर की याला ॥ अन्य रहाटी कधिं न करी हा योग्य तरी देण्याला ॥ दिधला वर तुजला ॥ भोलाशंकर तो वदला ॥ १ ॥ ऐकतांच त्या तोष होउनी नाचू लागला फार ॥ त्रैलोक्यामार्ध तोष माइना नाही त्याला पार ॥ मृत्यूलोकाला ॥ सत्वर मग तो तरि गेला ॥ २॥ गाइ ब्राह्मण संत भक्त ते ऋषिचका शोधूनी ॥ . ठेवि मस्ताकै हस्त तयाच्या जाति भस्म होऊनी ॥ छपन्न देश सगळे ॥ सर्व भूभुज भस्म केले ॥ ३ ॥ कांता घेउनि ब्राह्मण पळती गिरीकंदरीं लपती ॥- पृथ्वि सर्वही भयाण झाली लोक भीउनी जाती ॥ उपाय नच कांहीं ॥ जन झाले त्राही त्राही ॥ ४ ॥