पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय बारावा.. पद. (ऐक सज्जना मन मोहना, ) या चालीवर. आणिक मंडित चिन्हांनी ऐका नांवें तरि त्यांची ॥. कर्तृत्व नियंतृत्व भोक्तृत्व विभुत्व साक्षित्वहि साची ॥ मायाचका चालक तो बा त्रिविधभेद जो गणिनाची ॥ ऐसा शंभू असुरा तेव्हां सांगे सेवा भस्माची ॥ १ ॥ दिंडी नित्य आणुनि तो भस्म देइ देवा ॥ पूज्य भावहि दावुनी करी सेवा ॥ परी गर्वाने मातला असुर भारी ॥ ह्मणे संहारिन प्रजा तरी सारी ॥ १ ॥ गाइ ब्राह्मण देखता कोप येई ॥ कधी मारिन हे असे त्यास होई ॥ त्यास मारुनि मागुती सर्व देव ॥ कधीं जिंकिन हो हाच मनीं भाव ॥२॥ प्रथम जिंकावे इंद्र ब्रह्मदेव ॥ मागुती तो विष्णुही वामदेव ॥ तीन लोकां जिंकिता इंद्र कोण ॥ मीच होइन शेवटी तरी जाण ॥ ३ ॥ मनी बांधोनी अशी गांठ पाही ॥ जाय कैलासा कपटि असुर तो ही ॥ ह्मणे देवा भस्म तें मिळनारे ॥ पृथ्वि सारी शोधुनी पाहिलीरे ॥ ४ ॥ चार लक्षांची वस्ति जरी आहे ॥ सवालक्षांची घडामोड पाहे ॥ भस्म अर्पावें तुला नेम माझा ॥ नेम टळतो युक्ति ती काहिं योजा ॥ ५ ॥ अंजनोगीत. हरहर शंभो पार्वतिरमणा ॥ विरूपाक्षा त्रिपुरछेदना ॥ उमावल्लभा नागभूषणा ॥ देई वर माते ॥ १ ॥ साकी. ज्याचे मस्तकिं ठेविन कर मी भस्म तरी तो व्हावा ॥ येणे साधे कार्य फारची प्रसन्न होउनि देवा ॥ ऐसा वर देई ॥ ह्मणुनी लागतसे पायीं ॥ १ ॥ ...