पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. साकी. अभेद प्रेमळ भक्त पाहुनी त्याच्या मुंडाची हो ॥ माळ करूनी गळ्यांत घाली खति नसे त्याला हो ॥ भोला शंकर तो ॥ राहे नित्य स्मशानी तो ॥ १ ॥ स्मशान त्यजुनी गृहास येती त्यांची जडते प्रीती ॥ विषयावरती ह्मणुनि स्मशानी शंकर कारतो वस्ती ॥ भोला शंकर तो ॥ शरणागत रक्षण करितो ॥ २ ॥ पद. (श्रीसांबाच्या समान देवत, ) या चालीवर. पिंड ब्रह्मांड पंच भुतेही तत्वासह जाळुनी ॥ जें उरतें सर्व परी निरसुनी ॥ धृ० ॥ स्वात्मसुखाचें भस्म तें तरी ब्रह्मानंद होउनी ॥ सुखावे अंगीं तें चर्चुनी ॥ षड्विकार ही ज्याला नसती अमूर्त मूर्त मानुनी ।। भजती हो त्यास लीन होउनी ॥ विकार रहिताचे निर्विकार जो, परब्रह्म जो जनीं ॥ ऐसा भासत नाहीं कुणी ॥ चाल ॥ अस्ति जायतें विपरिणमतचि तें तरी ॥ अपेक्षीयतें निधनचि वाटें वरी ॥ षड्गुणैश्वर्य जो वसतो भुवनांतरीं ॥ चाल ॥ . यशःकीर्तिही ज्ञान औदार्य वैराग्य पूर्णपणीं ॥ वाटे तोष तो त्यास पाहुनी ॥ १ ॥ १ अस्ति=आहे, जायतें जन्मतें, विपरिणमतें नाश पावतें. २ अपक्षीयतें-क्षय पावतें..