पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय बारावा. जळी गार ती नाद अंबरी कर्परिं मिळते ज्योती ॥ ऐक्य होउनी सागरिं गेली जैशी गंगानदि ती ॥ पतिसह ती बहुला ॥ मिळून गेली रूपाला ॥ २ ॥ शिवमंत्राचा तसा कथेचा महिमा मोठा आहे ॥ भस्मलेपने उद्धरिले जन संख्या नाहीं पाहे ॥ . शिवदिक्षा ती ही ॥ रुद्राक्ष धारण तैसें ही ॥ ३ ॥ भस्मांतुनि तो भस्मासुर ही निघतां झाला कैसा ॥ शिवद्रोहि तो परम घातकी पापी असुनी ऐसा ॥ कैसा उद्धरिला ॥ सांगेन त्या चरित्राला ॥ ४ ॥ पद (चरण चाली चालतां तिघे ती, ) या चालीवर. कैलासनगीं प्रदोषकाळी भस्म घेउनी करीं ॥ अंगीं चर्ची उमारमण तो झाले नवलचि परी ॥ यांत एक तो खडा सांपडे टाकी भूमीवरी ॥ नवल शिवाचे सांगु किती मी असूरचि प्रगटे तरी ॥ ' भस्मासुर त्या नांव ठेविलें तोषे बहु अंतरीं ॥ सदाशिवारे दास. तुझा मी सांगे मज चाकरी ॥ चिताभस्म तें आणुन द्यावे निस नित्य तें तरी ॥ सेवा तरि ही योग्य तुला बा नित्य नेम तूं धरी ॥ ऐशी आज्ञा होता त्याला लोळे चरणावरी ॥ कर्मभूमिला निस येउनी शोधी पृथ्वी तरी ॥ चाल ॥ . शिवभक्तिच ज्याला, पारायण जो करी ॥ लिंगार्चन घडले ज्याला शिववासरी ॥ प्रदोष शिवरात्रहि प्रेमें जो आचरी ॥ चाल ॥ सदा सर्वदां नाम घेउनी ऐके कीर्तन वरी ॥ भस्म तयाचे शिवास देतां अंगिकार तो करी ॥ १॥