पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. मासामध्ये मात्र मास हा माहेमा वर्णी व्यास ॥ कृष्णा पश्च्यिा चतुर्दशीला समना गुभचि तो दिवस ।। पातक हारक तो ॥ ऐका सुकथा मी वदतों ॥ ३ ॥ विच्याद्रीमा परम वातकी एक व्याध तो होता ॥ बहुत जयाने जीव मारिलें संख्या नच ये बदतां ॥ वेउनि वाण कर ॥ चाले परम दुराचारी ॥ ४ ॥ पाश वागुग बांधुनि की वस्त्रे घेऊनि हातीं ॥ चाले तेव्हां हिलक पयही फारच भिटनी जाती ।। जातां काननि हो | नेत्रे शिवस्यान पाही ॥ ५ ॥ दिंडी न्याच दिवशी शिवरात्र पर्व होते ॥ चहूं कडुनी यात्राहे येइ तेथें ॥ मंदिगला श्रृंगार फार केला !! जणू कैलासचि असा भास झाला ॥ २ ॥ गगन चुत्रित ते शिखर तया होते ॥ रत्नजडितांच तो कळस तरी त्यातें ।। मोलेकांच्या झालरी मांदेराला || फार शोभा हो आलि तये वेळा ॥ २ ॥ रनमय ते शिवलिंग मधे होते ॥ यो पाजती भक त्यातें ॥ मृदंगार्दिक वेनि वाद्य हाती ॥ मुखी हर हर हे नाम गर्जताती ॥ ३.॥ पद (दो दिवसाची तनु ही साची,) या चालीवर. परम सुवासिक द्रव्य वेटनी पुजिति कोणी मदनारी ॥ सहस्र नामाहे मुखीं बेउनी बिल्वदळातें वाहति वरी ॥ परिमळ पुष्य में वाहुनि शिवनामाचा गजर करी ॥ नानापरिची वाद्ये वाजति तद्रव नमाये अंबरीं ॥ दीपावळिनें मंदिर शोभे आहे हा कां भानु तरी ॥ विस्मय वाटे सकळ जनांना झाली मन्माते त्याच परी ॥ शिव शिव हा हर नामें गर्जति होउनि सद्गद जन अंतरीं ॥ परम ॥१॥