पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१६० संगीत शिवलीलामृत. ( टुबरी चाल, ) तुंबरास घेउनि जाई ॥ विंध्याचलीं तूं सत्वर बाई ॥ १० ॥ पती तुझा तो पिशाच होई ॥ विंध्याचलिं तो हिंडत राही ॥ शिवलीला त्या श्रवण करवि कांहीं ॥ तुंबरास०॥ १॥ : (चरण चालि चालतां तिघे ती,) या चालीवर. विंध्याचलिं ती सत्वर गेली आज्ञा झाल्यावरी ॥ धृ०॥ पिशाच तेथे नग्न देखिला हिंडत वेड्यापरी ॥ तुंबर हस्ते त्यास बांधिलं एका वृक्षावरी ॥ मस्तवल्लिका कानुनि मिळवी सप्तसूर सत्वरी ॥ शिवलीला मग गाउं लागला रागरागिणी वरी ॥ पशपक्षी ते उद्धरती हो ऐकनि लीला तरी ॥ शिवकीर्तन ही मात्रा देतां आला शुद्धीवरी ॥ सोडा सोडा ह्मणं लागला आतां मज सत्वरी ॥ सोडतांच तो जाउनि पडला तुंबर चरणावरी ॥ धन्यधन्य तं स्वामि दयाळा आतां पावन करी ॥ चाल ॥ कांते मजला तूं धन्यचि केले तरी ॥ उद्धरिलें मजला कांता तं गे खरी ॥ उपदेश मला तो द्यावा हो सत्वरी ॥ चाल ॥ उपदेशी मग तुंबर याला मंत्रहि पंचाक्षरी ॥ जप करितां तो विमान आलें स्त्रीसह गेला वरी ॥ १ ॥ साकी शंभूपाशी मिरवित नेले दोघे लागति चरणा ॥ शिवरूपी ते मिळून गेले जळी स्थिती जी लवणा ॥ होते तैशी हो ॥ शिव रूपी ते मिळती हो ॥१॥