पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत .

  • साकी.

मग गुरु सांगे पंचाक्षारही मंत्र तरी तो तिजला ॥ शिवलीलामृत गुरूमुखाने सर्वचि ऐके बहुला ॥ श्रवणभक्ति बा ती ॥ श्रष्ठाच जाणा त्रीजगतीं ॥ १ ॥ सत्संगें निःसंगचि होई निःसंगें बा पाही ॥ निर्मोहचि तो निर्मोहत्वे निश्चित मन होई ही ॥ उद्वेग मग नाहीं ॥ प्राणी पापरहित होई ॥ २ ॥ शिवनामा ती घेइ सर्वदां दोष कसा मग राही ॥ परम पवित्रचि बहुला झाली ह्याचा अनुभव पाही संशय कसला ही ॥ प्राण्या घेउं नको कांहीं ॥ ३ ॥ . पद. , (दो दिवसाची, ) या चालीवर. तव्याचा तो बुरेसा जातां सहज आरसा होई हो ॥ धृ०॥ परिस लागतां लोहाला तो सवर्ण तरि तें होतें हो ॥ अग्नी मध्ये काष्ठे पडतां अग्नीमय ती होती हो ॥ ओहळ मिळतां गंगानदिला गंगाजळ ते होई हो ॥ जप करितां तें पुण्य बहुतची पाप सर्वही जातें हो ॥ मननाहुनि ही निदिध्यास तो साक्षा मग ती सहजचि हो ॥ शिवरूप तो झाला पाही काही संशय नाहीं हो ॥ निर्दोष तशी बहुला झाली नाम गातसे वाचें हो ॥ १॥ . पद. ( झाली ज्याची उपवर, ) या चालीवर. श्रवणे पावन प्राणी होती ॥ या जन्मी मुक्तिच मिळते ती ॥ धृ०॥ तीर्थाटन तें करणें नलगे ॥ सार्थकता ती श्रवणे येती ॥ सत्समागमाह ज्यास मिळेना ॥ करावि त्याने तीर्थं तरि ती ॥ १. तवा आणि बुरसा हे शब्द पोथीत होते तेच कायम ठेविले आहेत.