पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय बारावा. साकी. वनिता जी हो जारिण आहे यमकिंकर ते तिजला ॥ धरुनी नेउनि स्मरगृहामधिं तप्तलोहपारघाला ॥ घालान, ते तिजला ॥ ह्मणती करी विलासाला ॥ १ ॥ ऐसें ऐकुनि बहुला तेव्हां भयाभीत बहु झाली ॥ अनुताप तिला फार होउनी ढळढळ अश्रू गाळी ॥ मग पुराणिकाला ॥ सांगे सर्वहि त्यावेळां ॥ २ ॥ पद. _ (अक्रुर हा नेतो श्रीकृष्णाला,) या चालीवर, गुरुराया दासी लीन चरणाला ॥ सांगा उपाय ते मजला ॥ धृ०॥ व्यभिचार आजवरी बहु केला ॥ त्यांतुनि तारा हो इजला ॥ यमकिंकर ते ममांत समयाला ॥ छळतिल हो बहुतचि मजला ॥ कैसें सोसू अपार दुःखाला ॥ कंपचि आतां मज सुटला ॥ तीव्रपाश ते बांधनि कंठाला ॥ मारिति घेउनि शस्त्राला ॥ असिपत्रवनी फिरावीत बहु वेळा ॥ उफराटे टांगुनि मजला ॥ चाल । नरकी दतिल फेंकूनी ॥ गुरुराया ॥ तप्तभूमिवर नेऊनीं ॥ गुरुराया ॥ हिंडविती मजला मारूनी ॥ गुरुराया ॥ तीक्ष्ण शस्त्र तें टोंचति पोटाला ॥ धूम्रावर टांगुनि मजला ॥ चंडशिळा बांधतील चरणाला । कोण सोडवील हो मजला ॥ १ ॥ दिंडी. गोड लागेना अन्न तिला कांहीं ॥ शोक करिते त्यास हो पार नाहीं ॥ जाउं कोणा शरण मी तरी आतां ॥ कोण होइल हो सांग मला त्राता ॥१॥ गुरूराया शरण मी तुझे पायीं ॥ कृपा जरि तूं करशील उणें काई ॥ ... वदुनि ऐसें करि धरी चरण त्याचे ॥ तारि तारी हेच हो बदे वाचें ॥ २॥