पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत, श्लोक संपत्ति सारी गणिकेस वाही ॥ जारास अी बहुला तशी ही ॥ दोघेहि पापांत बुडोनि गेली ॥ तो मृत्युपाळी विदुरास आली ॥ १॥ पढ ( जाउं नकारे विषया, ) या चालीवर. कुंभीपाकी जाउनि पडला भोगित दु:खा हो । विंध्याचलि मग पिशाच योनित ढकलिति त्याला हो ॥ ५० ॥ आळेपिळे ते देउनि अंगा हिँडे रानी हो ॥ सुधा तुषा बहु पीडा देती खाण्या न मिळ हो ॥ रक्तवर्ण तो देह तयाचा शेंदर भाळीं हो ॥ चाल ॥ वृक्षासी तो घेई टांगूनी ॥ सवेंचि देई हाकहि फिरफिरुनी ॥ रक्तपितीने गेला नासूनी ॥ चाल ॥ फलमूलादिक त्यास मिळेना भोगि विपत्ती हो ॥ १ ॥ पद. ( दिसली पुनरपि, ) या चालीवर. इकडे बहुला धवरहित जरी दुःख तयाचें नसे तिला || पोटी होता एक पुत्र हो कोणा पासुनि तो तिजला ॥ झाला, याचे स्मरण मुळी हो कांही नव्हते त्या स्त्रीला || शिवरात्रीचे पर्व जबाळं तें आले जाणुनि जन सगळा ॥ गोकर्णाला जाउं लागला वाजति वाद्ये त्या वेळां ॥ शिवनामाचा घोष करति ते ठाव नसे हो पापाला ॥ नाम मुखीं जे गाति सर्वदां त्यांनिं जिंकिले त्या कलिला ॥ संगें घेउनि पुत्रा चाले त्यांच्या संगें ती बहुला ॥ स्नान करूनी लिंगदर्शना जाती झाली मग अबला ॥ . . महाबलेश्वर दर्शन घेउनि बसली पुराण श्रवणाला ॥ १॥