पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय बारावा. ते जन्मा जाती ॥ अनादर जे श्रवणीं करिती ॥ अन्य जन्मीं सूकर होती ॥ शिव चरित्रा उच्छेदीती ॥ वकयोनीला जाण पावती ॥ वक्त्यासी जे आसन देती ॥ शिवा सन्निध तेच बैसती ॥ वस्त्र अर्पितां अन्न मिळती ॥ पुराण श्रवण जे वरवर करिती ॥ वैराग्य भक्तिहि अंगीं येती ॥ या विषयींची मूळ कथा ती ॥ सांगिन आतां तुझांसाठीं ॥ १ ॥ दिंडी दक्षिणेसी ग्राम ते एक पाही ॥ नाम बाष्कळ हो धर्म तिथे नाहीं ॥ स्त्री पुरुष ते सर्व हो व्यभीचारी ॥ धर्म नाही ठाउका अनाचारी ॥१॥ चेदशास्त्रहि ठाउके नसे कोणा ॥ नयन असुनी अंध ते तरी जाणा ॥ याच परिचे अपवित्र लोक जेथें ॥ धर्म कैसा राहील सांग तेथें ॥२॥ जार तस्कर चहाड दुराचारी ॥ मद्यपी ते मार्गन वित्तहारी ॥ जनक जननीला त्रास बहू देती ॥ अशी वस्ती नगरिची तरी होती ॥ ३ ॥ साकी स्या ग्रामीचा एक विप्र तो नामें विदुरचि होता ॥ वेश्येशी रत अहोरात्र ही सोडुनि अपुली कांता ॥ काम कर्दमी तो ॥ स्वस्त्री सोडुनि बहु रमतो ॥ १ ॥ बहुला नामें त्याची कांता तीही जारिणि फार ॥ जारासी ती क्रीडत असतां धरी तीस तो विदुर ॥ जार पळुनि गेला ॥ विदुर मारि हो कांतेला ॥ २ ॥ पद. (गणया गणया, ) या चालीवर. होउनि वश तूं जाराला ॥ मीळविलें बहु द्रव्याला ॥ द्रव्यचि दे गे तें मजला ॥ नेउनि अर्पिन वेश्येला ॥ देऊ कोठुनि द्रव्याला ॥ ऐकुनि मारी तो तिजला ॥ . घेत हिरूनी वस्तूला ॥ टाकी देउनि वेश्येला ॥ १ ॥