पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१५४ संगीत शिवलीलामृत.. प्रीतीने बा पूजुनि वक्ता भूषवि मग रत्नांनी ॥ रत्ने देतां तीं ॥ नेत्र प्रकाशित हो होती ॥ ३ ॥ भावे पूजन करितां त्याचे तुष्टे पार्वतिरमण ॥ दरिद् कधिं ते त्यास शिवेना मिळेल शिवपद जाण ॥ धरुनी भक्तीला ॥ भावे पूजा वक्त्याला ॥ ४ ॥ अभंग. टाकी पाऊल कथेशी ॥ संहारिती पापराशी ॥ घालुनि ऊष्णीष ऐकती ॥ जन्मांतर पक्षी होती ॥ ह्मणाल मग तुह्मी आतां ॥ काय दोष त्या काढीतां ॥ मुख्य पल्लव तो सोडा ॥ सुखाचा बा हाची जोडा ॥ १ ॥ .. अमंग . . विडा खाऊनीया कथा जे ऐकती ॥ यातना भोगीती नानापरी ॥ . ऐकतां कथेशी निद्रा जे हो घेती ॥ निद्रा मोडावी ती बह यत्नें ॥ अंतर सद्गद् नेत्रों यावें पाणी ॥ मग निद्रा कोठूनी स्पर्शल ती ॥ वरी ते जीवन व्यर्थहो लावून ॥ भक्ति भावावीण व्यर्थ तें हो ॥ १ ॥ वक्त्याहून उंच आसनी तत्वतां ॥ धरूंनी अहंता बसूं नये ।। हे न मानीती ते काग होती ॥ जगपुरिष भक्षिती सर्वदां हो ॥ विरासन घालती वृक्ष ते हो होती ॥ पाय पसरीती त्यास दंड ॥ जेठा घालूनीया बळेच बैसती । नरकी त्या टाकीती यमदूत ॥ श्रवण सोडूनी दाटूनी नीजती ॥ अजगर होती जाणा ते हो ॥ नमन केलिया वांचून बैसती ॥ वंशवृक्ष होती चांडाळ ते ॥ २ ॥ कटाव कथेत बोलति भलत्या गोष्टी ॥ मडुक होउन सदां वटवटी ॥ टाळि न याजवि होउन हट्टी ॥ संसारी तो होतो कष्टी ॥ शिब कीर्तनी करी चावटी ॥ ॥ सारमेय तो शतजन्म कोटी ॥ दुरुत्तरें जे बोलती निश्चिती ॥ सरडाचे १ पागोटें.