पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय बारावा. अकस्मात तो वार्ता आली आईबाप धांवती ॥ ऐकण्या तशी कथेस हो बा मती ॥ ग्रामांतारं तो प्रियपति गेला प्रिया वाट पाहती ॥ तो पत्र आले ऐकण्या धांवती ॥ निधनासि धन अंधा नयनाच तृषिता जीवन जसें ।। श्रवणी तुह्मा सुख व्हावे तसे ॥ चिंता निद्रा दूर करूनी श्रवणीं सादर असा ।। कद! राखि धनाला जसा ॥ चाल ॥ वक्ता पंडित तो गुरु समजा अंतरीं ॥ शंकर मानुनि त्या पूजन त्याचे करी ॥ वदतां शिवमहिमा प्राशन करि सत्वरी ।। चाल ॥ सुरभीच्या त्या स्तनांतुनी बा सुधा धार वरवरी ॥ येई तशी लीला प्राशन करी ॥ श्लोक. वक्ता मोठा समज तरि तूं श्रेष्ट या मृत्यु लोकीं ॥ जे जे सांगी श्रवण करि तूं मानुनी सत्य तें की ।। खोट्या प्रश्ना करुनि जरि तूं त्रासवीशील त्यातें ॥ भूताची बा गति सहजची प्राप्त होईल तूंतें ॥ १ ॥ साकी पुराणिकाला नमन करावें सभेमधे बा जाणी ॥ उगाचि गर्ने जाशिल उठुनी जरी कथा सोडूनी ॥ अल्पायुषि होशी ॥ भोगशील बहु दुःखाशी ॥ १ ॥ कुटील खळ वा पापी धूर्तचि नलगे ऐसा श्रोता ॥ दुग्ध जरी तें वपू पुष्टवी परि ते वीषचि ज्वरिता ॥ श्रवणीं बैसुनी ॥ खंडुं नको ती कुतौनीं ॥ २ ॥ गप्पा नलगे मनन करावें कथा सर्व ऐकूनी ॥