पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. अध्याय १२ वा. श्लोक प्रभो शरण मी तुला करि दया हि दासा वरी ॥ किती तरि तुला स्तवू सदयता मनीं बा धरी ॥ दया मनिं तुझ्या नसे सुख मला तरी ना मिळे ॥ सुझे चरण पाहण्या मन हि 'घाबरें जाहलें ॥ १॥ पद.. ( श्रीसांवाच्या समान दैवत, ) या चालीवर. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ही ब्रह्मचारि ते तरी ॥ गृहस्थ वानप्रस्थ पूर्णचि परी ॥ धृ० ॥ वृद्ध तरुण हो स्त्री वालानो शिव नामचि अंतरीं ॥ ध्याहो नका विसंबूं क्षणभरी ॥ शिव स्मरण हे जया नावडे अपवित्रचि तो तरी ॥ समजा अंत्यजाहुन ही वरी ॥ वस्त्राभरणें मंडित तनु जरि नित्य स्वयें तो करी ॥ समजा तें भूषित प्रेता परी ॥ पशुसम तोही अन्न भक्षितो नेत्र तयाचे तरी ॥ मयुरांगिच्या ते नयना परी ॥ वारुळं छिद्रासम कर्णचि ते हस्त चरण ते तरी ॥ दिसती शाखा गेल्या वरी ॥ चाल ॥ शिव भजनाविण जो बुडो समुद्रांतरीं ॥ ना तार वडवानी भस्म करो सत्वरी ॥ वा काळसर्प तो दंशुनि जावो तरी ॥ चाल ॥ जैसी मुंगी गुळा न सोडी अर्ध तुटे ती परी ॥ तैशी बा श्रवणीं आवड धरी ॥ १ ॥ एक सूत बा पोटी असुनी होता प्रियकर अती ॥ चुकला शोधा न चाले मती ॥