पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. पद (शिवाज्ञेची वाट न पाहतां, ) या चालीवर. अध्यायाचे श्रवणचि करितां तोषाचं रुद्राला ॥ कल्पद्रुम हो हा तरि जाणा पुरवि कामनेला ॥ धृ०॥ मृत्युंजयजप रुद्रावर्तन कराच नियमानें ॥ ग्रहपीडा ती दूर होइ बा टळतिल ती विघ्नें ॥ । पिशाच बाधा कधिं नच होई याचे पठणानें ॥ दारुण रोगहि नाश पावती जाण निश्चयाने ॥ चाल ॥ सारें लटके मानिलः जो येथें ॥ अल्पायुष तें होइल हो त्याते ॥ चांडाळचि तो निदिल जो याते ॥ चाल ॥ विटाळ त्याचा काधं नच व्हावा सोडी संगतिला ॥ यांझ ह्मणावी जननी त्याची जार तिला हा झाला ॥१॥ पद. (दोदिवसाची, ) या चालीवर. भाषण कार जो अशा नराशी पापि ह्मणावें त्यास तरी ॥ स्वगृह त्यांना वर्ज करावें न जावें बा त्याचे घरीं ॥ हिंस्रकगहिं ते सुशिल न जाती तेवि त्यजावें त्यास दुरी ।। वीष भक्षितां नयनी पाहती पंक्तिस त्याच्या मूर्ख तरी ॥ वसती त्यांना मत्यु आला संदेह नाहीं तीळभरी ॥ शिवलीला जे अखंड पढती त्यावरि शंभू कृपा करी ॥ ना तरि वाचा अध्यायचि हा बह्मानंद तो त्यांचे घरीं ॥ अनुष्ठान तें करितां याचे नित्य रुद्र तो होइ तरी ॥ १ ॥ अंजनीगीत गिरिजारमणा कृपा करावी ॥ बाळकृष्ण या दासा द्यावी ॥ सुमति नाथा देउनि बरवी ॥ वदवी तव लीला ॥ १ ॥