पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय अकरावा. शंभर रुद्रचि करितां पाही ॥ होई नर तो शतायुषी ही ॥ अध्यायाचें करितां पठण ही ॥ शिवरूपी तो होई ॥ ४ ॥ समजा तरि तो मुक्ताचे येथें ॥ बहुत तरति ते त्याचे तीथें ॥ गुप्त जाहले नारद मुनि ते ॥ पाराशर तोपें ॥ ५ ॥ अगणित धन ते अर्पा गुरुला ॥ संतोषचि तो गुरुते झाला ॥ सवें घेउनी सर्व द्विजाला ॥ जाई तो आश्रमीं ॥ ६ ॥ अभंग भद्रसेनाचे हो आख्यान पढती ॥ आयुष्य संतती वाढे त्यांची ॥ अंती काळाची हो नाहीं तया भीती ॥ वंदोनिया नेती शीवपदा ॥ ऐकतां पढतां पुण्य तें विशेष ॥जाती सर्व दोष नीरसूनी ॥ सहस्रकपिलादान पुण्य होत ॥ नित्य जे वाचीत आख्यान हे ॥ अभक्ष भक्षण सुरापानादीक ॥ ब्रह्महत्यादीक पापें जातीं ॥ १ ॥ वाचा अध्याय त्रिकाळीं ॥ गंडांतरें दूर झालीं ॥ तरावयासि निःशेष ॥ आयुष्यहीन लोकांस ॥ कलियुगीं तारक बारे । अनुष्ठान हे निधोरें । रुद्रघोष तो करी नित्य ॥ हेंच अंती तारक सत्य ॥ २ ॥ साकी. सुधर्मपुत्रा राज्य देऊनी युवराजहि ते पाही ।। प्रधानात्मजा सखें देऊनी तपो वनीं मग राही ॥ सचिवासह गेला ॥ अनुष्ठान ते करण्याला ॥ १ ॥ रुद्रध्यान ते करिती दोघे महारुद्र तो तोषे ॥ . राव प्रधानहि मिरवित नेले बसवुनि यानी सरसें ॥ काही दिवस होते ॥ वैकुंठी त्या दोघे ते ॥ २ ॥ शेवाट गेले शिवपादं दोघे शिवरूपी ते झाले ॥ अकराव्या ह्या अध्यायाला शिवरूपचि बा आलें ॥ अकरा रुद्राचें ॥ ह्मणा शिव शिव तरि वाचें ॥ ३ ॥