पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृन.. दिंडी. प्रधानासह तो भद्रसेन जाई ॥ हस्त जोडुनि मुनि पुढें लीन होई ॥ दिव्य सुमनें आणुनी पुजा केली ॥ षोडशोपचार, पूर्ण तयेवेळी ॥ १॥ त्रिकाळाचें ज्ञान ते तुह्मां आहे ॥ गमन त्रिभुवनिं आपलें सदां राहे ॥ मार्ग कांहीं देखिले नवल स्वामी ॥ सर्व सांगा ऐकण्या सिद्ध हा मी ॥२॥ पद. ( नाहीं पापचि या देही.) या चालीवर. पाहिले शंभु दूताला ॥ दशभुज पंचवदन ज्याला ॥ धृ०॥ बांधुनि नेती मृत्यूला ॥ सोडिति ते तव पुत्राला ॥ उत्तम केलें शांतिला ॥ प्ररिलें वीरभद्राला ॥ बा तव पुत्र रक्षण्याला ॥ वीरभद्र तो मृत्यूला ॥ बोले मज देखत त्याला ॥ कोणी दिधले आशेला ॥ अणण्या नृपतनयाला ॥ दहासहस्र वर्ष याला ॥ असें अयुष्य हो ज्याला ॥ तो पावेल राज्याला ।। रुद्रमहिमा तो तुजला ॥ ठाऊक असुनी तूं त्याला || कैसे आणलें चांडाळा ॥ पाहिले० ॥ १ ॥ दिंडी. चित्रगुप्ताते पुसे पितृराज ॥ कशी झाली चूक हो तरी आज ॥ पत्रिका ती वांचुनी तई पाही । वर्ष द्वादश होतांच मत्यु येई ॥ १ ॥ मत्यु नोहे गंडांतरची होतें ॥ महत्पुण्ये निरसुनी जाइ हो, तें ॥ स्वापराधे कष्टि तो सूर्यसूत ॥ शंभु चरणी लीन तो तरी होत ॥ २॥ अंजनीगीत कृतांत मग तो उभा राहिला ॥ गिरिजावर मग त्याने स्तविला !! न कळतां हा दोषाच घडला ॥ क्षमा करावी ॥ १ ॥ नारदवचना परिसुनि नृपती ॥ लोळण घाली चरणा वरती ।। आणिक सहस्र अवर्तने ती ॥ करी आनंदानें ॥ २॥