पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

___ संगीत शिवलीलामृत. तितके आतां येथे अणतों आज्ञा कार बा मजला ॥ रुद्रानुष्ठान जाणति पूचि जाणाति जे ध्यानाला ॥ परधन दारा वमन समजती पूजिति जे शंभूला ॥ दुष्टप्रतिग्रह कधिं नच घेती प्राण जरी तो गेला ॥ सामध्ये ते चालुं न देती थांबविती सूर्याला ॥ साक्षात् आणुनि उभा कारति त्या गिरिजावर शंभूला ॥ १ ॥ साकी. ऐसे ब्राह्मण सवें घेउनी व्यासपिता तो बसला ॥ सहस्रघट ते स्थापुनि हातीं मंत्रित करि सर्वाला ॥ गंगाजळ ओती ॥ आम्रपल्लव घटावरती ॥ १ ॥ रुद्रघोष तो ब्राह्मण करुनी अनुष्टान ते करिती ॥ सप्तदनि ते पूर्णचि झाले आला रवि तो वरती ॥ मृत्युसमय आला ॥ बाळ पडे तो धरणीला ॥ २ ॥ घाबरला नप गुरू बोलतो ना भी ना भी राया ॥ रुद्रोदक ते शिंपुन नंदन सावध करि त्यां समया ॥ पसती मग त्याला ॥ सांगे सर्वचि आझाला ॥ ३ ॥ परम भयानक उर्व जटा त्या भाळी शेंदुर लाल ॥ विशाळ दाढा नेत्र लालचि मला भासला काळ ॥ ऐशा पुरुषानें ॥ धरलें मज निजपाशानें ॥ ४ ॥ पंचवदन ज्या दशभुजाही भस्म आंगिं हो ज्याच्या . दशहस्ती ती आयुधे सारी रविसम तेजहि त्याच्या ॥ देहीं मज दिसलें ॥ अघतम सारें में हरलें ॥५॥ महाराज ते येउनि त्यांनी बंध मुक्त मज केलें ॥ काळपुरुष तो पाशी बांधुनि ताडण कारताचे गेले ॥ तेथुन आलों मी ॥ धन्य दयाळा तूं स्वामी ॥ ६ ॥ पुत्र मुखीचे बोल ऐकुनी जयजयकारचि केला ॥ नमस्कार तो घालि ब्राह्मणां संतोष नृपा झाला ॥ विप्र चराण लोळे ॥ गडबड गडबड त्यावेळें ॥ ७ ॥