पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भध्याय अकरावा. पद . (जाउं नकारे विषया, ) या चालीवर. यमकिंकर ते रिते हिंडती पाप नसें कांहीं ॥ पापी प्राणी कोणि दिसेना रिते पाश तेही ॥ धृ०॥ यम मग पुसुनी विधिस निर्मी अभक्ति कत्या ती ॥ . जनहृदयीं ती संचरली मग मत्सर करवी ती ॥ . शिवद्वेष ते करूं लागले अल्प मती हो ती ॥ नरकांमधे ते मग पडती कीटक ते होती ॥ हरिहर यांचा भेद मानिती नरकी ते जाती ॥ रुद्रानुष्ठान आयुष्याची वृद्धी करतें ही ॥१॥ साकी. . रुद्रावर्तन अयुत करीबा शिवावरी तूं राया ॥ अभिषेकाची धार धरावी टळे मृत्यु या समया ॥ अथवा शतघट ते ॥ स्थापुनि कार वा शांतीतें ॥ १ ॥ शतवट स्थापुनि वृक्षपल्लवा आणुनि त्यांतचि घाली ॥ रुद्राने तें उदक मंत्रुनि शिंचन कर या वेळी ॥ तुझे पुत्रावरी ॥ टळेल मृत्यु जाण तरी ॥ २ ॥ - अंजनीगीत अवर्तने ती दहासहस्रची ॥ नित्य करवि तूं शांत मनेंची ॥ सप्तदिनांती पुजा शिवाची ॥ पूर्ण करी राया ॥ १ ॥ पद. नमितों मी तुजला ॥ मुनिराया ॥ ५० ॥ सकळामध्ये मांडत तरि तूं पळवी मम शोकाला ॥ आचार्यत्वचि तुह्मी करूनी सांग करा शांतीला ॥ तुझा संगें विप्र असति हे आणिक सांगा मजला ॥