पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय अकरावा. दिंडी. बहुत वाद्यांचा गजर होउं लागे ॥ नाद त्यांचा जाइ हो दूर वेगें ॥ शंगभंगादिक महाकाल थोर ॥ नाद सनया मंजूळ देति फार ॥ १ ॥ शंभुलीला गावुनी नाचताती ॥ घोष नामाचा करुनि भागताती ।। भद्रसेनाने होम पूर्ण केला ॥ बहुत रने देइ तो द्विजगणाला ॥ २॥ आर्या. किति दिली दक्षिणा ती, गणना त्याचि नये मला करितां ॥ याचक सारे ह्मणती, श्रमलो आह्मी गृहास ती नेतां ॥ १ ॥ मंत्राक्षत देउनि त्या, विजय असो बा तुझ्या सुता आतां ॥ तों एक नवल झालें, ऐसा आनंद होत जो असतां ॥ २॥ सुगंधवनी वसंतचि, काशी क्षेत्रांत स्वधूनी वाहे ॥ श्वेतोत्पल मडाणी, रमणलिंगास भक्तिनें वाहे ॥ ३ ॥ किंवा निर्धनिकाला, चिंतामणि तो जसा मिळावा हो ॥ क्षीराब्धि जसा क्षुधिता, तैसा नारद मुनी हि आला हो ॥ ४ ॥ पद. ( चाल साधी.) वाल्मिक मुनि ही प्रल्हादहि तो ऐसे शिष्यचि ज्याचे ॥ ज्याचे शिष्यहि वंद्य जगाला भाग्य किती त्या गुरुचें ॥धृ० ॥ चौसष्टकळा चौदा विद्या करतळमल हो ज्याला ॥ रूप जयाचे पाहुनि भासें नारायण हा आला ॥ इंद्रादिकही भीती बहुतचि पाहुनि तत्तेजाला ॥ . नारदमुनि तो देखुनि अग्नी मूर्तिमंत वर आला ॥ दक्षिणाग्नी गार्हपाहवनी उठती पाहुनि मुनिला ॥ . पाराशरादि सकळ विप्र ते नमती पदयुग मुनिचे ॥ वाल्मिक० ॥ १ होमा मध्ये तीन अग्नि असतात ते :–दक्षिणाग्नि, गार्हपत्याग्नि

  • आणि अहवनीताग्नि. असें तीन अग्नि नारदास पाहून उभे राहिले.