पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४४ संगीत शिवलीलामृत तो ध्वान माया सत्य जाण बा महत्तत्व तेथुनी ॥ त्रिविध अहंकार ते मागुनी ॥ सत्वांशाने पीतवसन तो द्रुहिण रजांशे तरी ॥ . तमाशें रुद्र निर्मिला वरी ॥ चाल ॥ स्वर्ग स्थित्यंत या कारणचि जो जाहला ॥ विधिस ह्मणतसे आतां रचि साष्टिला ॥ विधि मग ह्मणाला नाही ज्ञानचि मला ॥ चाल ॥ चौ वेदाचा उपदेशाचे तो शंभू मग त्या करी ॥ ऐकनी तोषे विधि अंतरीं ॥ १ ॥ चौवेदाचे सार असें बा रुद्राध्यायाच तरी ।।... जपतां पातक दूरचि करी ॥ विशेष गुह्यज्ञान असेना याहुनि भुवनत्रयीं ॥ ह्मणुनि जप करी तूं या समयीं ॥ रुद्राध्याय हा शिवरूपचि बा श्रीशंकर बोलला ॥ जपतां पावेल तो की तुला ॥ जे जे ऐकिति पठणचि करिती त्यांचे दर्शन तरी ॥ नेईल भवनदिच्या पैलतिरीं ॥ चाल ॥ कमलोद्भव सांगे सप्तसुताला तरी ॥ सांप्रदाय ऋषिंनी आणला मग भूवरी ॥ रुद्राध्यायचि तो किति वणू मी तरी ॥ चाल | जपतपदानहि करणे नलगे याहुनि दुसरें तरी ॥ ह्मणुनी आळस नको बा क्षणभरी ॥ २॥ .. पद. ( रुचती का तीर्थ यात्रा, ) या चालीवर. करतां हो पठण याचे नित्याच तें अंतरीं ॥ त्याच्या हो दर्शनाते सुर घेती वरवरी ॥ रुद्राचा फार मोठा महिमा या भूवरी ॥ महिमा हो फार झाला यम भ्याला अंतरीं ॥१॥