पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. जटाभार तो माथ्यावरती त्रितिय नेत्रिं तो वन्ही ॥ झुळझुळ वाहे शिरीं नरि ते अभयकर महा ज्ञानी ॥ शोभे चंद्र शिरीं ॥ भस्म चर्चिलें त्यां शरिरीं ॥ २ ॥ खट्रांगधारि नीलकंठ ज्या कसिलें व्याघ्रांबर तें ॥ नरमुंडाची माळ गळ्यामधि वेष्टी गजचर्माते ॥ व्यालं सर्व देहीं ॥ दशभुजा मिरविती पाही ॥ ३ ॥ ऐसा शंकर प्रगट होउनी कंदुकवत सहजचि हो ॥ वरचेवरती दशभूजांनी झेलुन धरि तिजला हो ॥ प्रसन्न मी तुजला ॥ इच्छित मागे तूं मजला ॥ ४ ॥ प्रसन्न जार तूं नागरीक हे उद्धरि सर्वचि देवा ॥ यानी बसवुनि निजपदि नेई इच्छा तरि ही पुरवा ॥ तथास्त शिव बोले ॥ सर्व नगर ते उद्धरिलें ॥ ५ ॥ महानंदा बैसुनि यानी सर्वासह मग चाले ॥ माता वंध सवें घेउनी शिवपद जवळी केलें ॥ आधिव्याधि नाहीं ॥ क्षुधा तृषा विरहित पाही ॥ ६ ॥ श्लोक ( चामर वृत्त.) काम क्रोध द्वंद दुःख मत्सरादि ज्या नसे ॥ अमता परीस जेथ नीर गोड ही असें ॥ कल्पवृक्ष शोभवीतसे अपार ती वने ॥ कामधेनु इच्छिलेच देत भक्त कारणे ॥ १ ॥ दिंडी महानंदा जाऊनि पदी राहे ॥ सर्वदां तें अविनाश असें आहे || .. भद्रसेनाला सांगुनी कथा ही ॥ ऋषी बोले काय ते पुढे पाही ॥१॥ साकी. कुक्कट मर्कट पूर्वीचे हे पुत्र तुझे बो राया ॥ रुद्राक्ष कंठिं भालिं विभूती त्या पुण्ये या समया ॥'