पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय अकरावा. जेव्हां शाळा दग्ध जाहली अग्नि शांतची झाला ॥ सौदागर तो पुसू लागला तेव्हां त्या वेश्येला ॥ लिंग कुठे आहे ॥ आणून दे मज लवलाहे ॥ ५ ॥ बोल ऐकुनी होइ घाबरी वक्षस्थळ तें बडवी ॥ ह्मणे लिंग तें दग्ध जाहले काय कोपली देवी ॥ अंबे जननी गे ॥ कैसी करणी झाली गे ॥ ६ ॥ श्लोक नेमाचा तो दूसरा आज दीन ॥ लिंगा साठी प्राण देईन जाण ॥ या हत्येची गोष्ट गे तूंच केली ॥ देवाला का बोल गे याच वेळीं ॥ १ ॥ दिंडी ‘अग्नि आणुनि सत्वरी सिद्ध केला ।। गगनपंथीं जाति हो तईं ज्वाला ॥ होइ सौदागर सिद्ध त्याच वेळां ॥ उडी टाकावी ह्मणुन जवळि आला ॥ अती लाघवि तो उमारंग पाही ॥ भवनदीतुन तारण्या तारु तो ही ॥ येइ कुंडाच्या जवळि शंभु तो कीं ॥ 'नमः शिवशिवाय' ह्मणुन उडी टाकी ॥ पद . ( दिसली पुनरापि गुप्त जाहली, ) या चालीवर. ऐसें देखुनि महानंदा नमन करी त्या शिवचरणा ॥ ५० ॥ संपत्ती ती लुटवी सारी कांहिं नसे हो त्या गणना ॥ अश्वशाळा गजशाळाही दान करी त्या सर्वांना ॥ सर्व वस्तु त्या दान करूनी करिती झाली मग स्नाना ॥ भस्म चर्चुनी रुद्राक्षहि ते लेवुनि करि हो शिवध्याना । शिव शिव ह्मणुनी उडी टाकिली नाहीं पुण्या त्या गणना ॥१॥ साकी. उदयाचलिं तें सूर्य बिंबही जैसें उदया येई ।।. तैसा शंकर भक्ता करितां प्रगटचि तेथे होई ।। महानंदेचें ॥ रक्षण करण्या हो साचें ॥ १ ॥