पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. पद. ( सरखे अनुसये, ) या चालीवर. पृथ्वी मोलचि कंकण तार हैं ॥ बत्तिस लक्षणि मी ही आहे ॥ तीन दिवस मम सदनीं राहे ॥ दासी तुमची झाले पाहे ॥ १॥ पद ( गजानना दे दर्शन, ) या चालीवर. तयासि तें तरि योग्य वाटलें ॥ सर्वेचि त्याने लिंग काढिले ।। सूर्यप्रभेहुन तेज आगळें ॥ न जाय वर्णिलें ॥ १ ॥ लिंग देखुनी ती त्यावेळी ॥ महानंदा तन्मय झाली ॥ बोले जय जय शंकर शली ॥ जगदात्मा तूं तरी ॥ २ ॥ लिंगप्रभेने नयन झांकती ॥ कोट कंकणे तुच्छ भासतीं ॥ अनन्य भावें भजतां मुक्ती ॥ मिळेल ती मजला ॥ ३ ॥ साको सौदागर मग तिला बोलला जतन करीगे याते ।। लिंगापाशी माझा प्राणाचे जार भंगुनि गेलें तें ॥ झाले दग्ध जरी ॥ अग्नी भाक्षन मीच तरी ॥ १ ॥ अवश्य ह्मणुनी नेउनि ठेवी नृत्यागारी त्याते ॥ ते दोघे ही रत्नमंचकी करिती मग शयनाते ॥ शंकर मग पाहे ॥ कैसे सत्व, तिचे आहे ॥ २ ॥ त्याचे आझें अग्नि लागला नृत्यागारा तेव्हां ॥ चहूं कडुन ते लोक धांवती झाली हाकाचे तेव्हां ।। जागृत ती केली ॥ मदनारीने त्यावेळी ॥ ३ ॥ प्रळयकाळसम आग्न पाहुनी झाली घाबरी अबला ॥ तैशा माजी उडी घालुनी सोडुन दे दोघाला ॥.. कुक्कट मर्कट ते ॥ जे तिने पाळिले होते ॥ ४ ॥