पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय अकरावा. एकादशी करि ती नियमानें ॥ सोमवारहि आचरि प्रेमानें ॥ शिवरात्र ही पाळि अनंदाने ॥ चाल ॥ अन्नसत्र ती सदां चालवी याचक कीर्ति गाती ॥ १ ॥ आर्या लक्ष त्रिदळे घेउनि, नित्य पुजी ती शिवास भक्तीने ॥ रुद्राभिषेक करवी, ब्राह्मण हस्ते शिवास प्रेमानें ॥ १ ॥ जें जें याचक इच्छिति, तें तें ती त्यास देइ भावाने ॥ प्रतिश्रावणमासी ती, कोटिलिंग करवि नित्य नियमानें ॥ २ ॥ कुक्कट मर्कट दोघे, प्रीतीने पाळिले तिने सदनीं ॥ नाचावयास शिकवी, बांधी रुद्राक्ष त्यास हस्तांनी ॥३॥ नृत्यागारों स्थापी, तेजस्वी लिंग ते तरी जाण ॥ कुक्कट मर्कट दोघे, बांधुनि तेथेच ती करी भजन ॥ ४ ॥ शिवलीला श्रवण करी, लिंगा पुढतीच ती करी नत्य ॥ शिवनाम मुखीं घेई, दोघे ही श्रवण करिति तें नित्य ॥ ५ ॥ सोडुनि दोघा करवीं, करवी हो नृत्य ती शिवा पुढती ।। त्यांच्या गळां कपाळी, स्वहस्तेच लावि शुद्ध हो विभती ॥६॥ वेश्येच्या संगतिने, नामाचा लाभ तो तया झाला ॥ कैसें सत्व तियेचें, बघण्या ते शंभु तो तिथे आला ॥ ७ ॥ अंजानीगीत. सौदागर तो शंकर झाला ॥ वेश्येच्या त्या सदना आला ॥ स्वरूप त्याचे देखुनि अबला ॥ तन्मय ती झाली ॥ १ ॥ यथासांग संग पूजन करुनी ॥ रत्नमंचकी बसवी नेउनी ॥ तो ती पाही कंकण नयनी ॥ त्याचे हस्तकीं ॥ २ ॥ स्वगातिल ही वस्तू दिसते ॥ विधिनें निर्मिलि ऐसें गमतें ॥ मानव प्राण्या शक्य न. हो, ते ॥ खचित मज वाटते ॥ ३ ॥ बोल ऐकुनि ते त्यावेळी ॥ वेश्ये हाती कंकण घाली ॥ आनंदित ती वेश्या झाली ॥ नेम करी तेव्हां ॥ ४॥ .