पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. साकी. भद्रसेन मग आणुनि पुत्रा घाली ऋषिचे चरणीं ॥ मित्र शशी सम तेजःपुंजचि दिसले त्याचे नयनीं ॥ पाराशर बोले ॥ पूर्व वृत्त त्या वेळें ॥ १ ॥ पद. ( दो दिवसाची तनु ही साची, ) या चालीवर. काश्मिर देशी नंदिग्रामी होती वेश्या तिथें तरी ।। महानंदा नाम तियेचें एक सुंदरी तीच खरी ॥ धृ० ॥ ललिताकति ती पाहुनि नयनी कंदपहि तो नृत्य करी ।। पूर्ण चंद्र हा चाले भूवरि कैसा आला खालिं तरी ॥ रत्नखचित तें यान बसाया मणिमय शोभे दंड करी ॥ चरण पादका रत्नखचित त्या शोभाति चरणीं बहत परीं || विचित्र वसनें दिव्य सुवासिक शोभति देही तिच्या तरी ॥ सुवर्णमय तो पलंग पाहुनि चंद्रप्रभा ती लाज धरी ॥ भाग्या पाहुनि शक्रहि लाजे कैसें भाग्या वर्ण तरी ॥ १ ॥ पद. ( जाऊ नकारे विषयाटविची, ) या चालीवर. गोमहिषीची खिल्लारे ती तिचे गृहीं होतीं ॥ वाजी गज बहु दासदासिही तिजला सुख देती ।। तिचे गायन ऐकुन किन्नर तटस्थ बहु होती ॥ धृ० ॥ नृत्यगती ती पाहुनि नयनीं कीर्ति बहू गाती । काम भोग तो तिचा इच्छुनी भूप गृहा येती ।। वेश्या असुनी पतिव्रता ती कीर्ति अशी होती ॥ प्रथम नेमिल्या परुषाचा तो दिवस न सरतां ती॥ इंद्रासहि ती वश होईना सांगुं किती कीर्ती ॥ शिवभक्तीपरि तिला बहुतची उदार बहु होती ॥ चाल ||