पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय भकरावा. कृष्णद्वैपायन याचा जो जनिता केवळ भासे ॥ त्रिकाळज्ञानी पाराशर जो विधि ज्याला लाजतसे ॥ असुर सत्र केलें ॥ ज्यांनी पित्यास बहु छळिलें ॥ ३ ॥ जैसे महिवर मानव फिरती तैसे रजनीचर ते ॥ पूर्वकालिं ते हिंडुनि बहुतचि त्रास देत सकळोते ॥ सत्र करुनि त्यांचे ॥ टाकी जाळुनि तरि साचे ॥ ४ ॥ जन्मेजय नप याने जैसें सर्पसत्र तें केलें ॥ अस्तिक ऋषिने मधे पडूनी कांहिंजणा वांचविलें ॥ तैसा पौलस्ती ॥ करी ऋषीला मध्यस्थी ॥ ५ ॥ रावणादिक हि राक्षस सारे तेव्हां रक्षण झाले ॥ नाहीतर तो ठेवित नव्हता एक असुर त्यावेळे ॥ वादी बहु छळिलें ॥ विश्वामित्रांसम केलें ॥ ६ ॥ दिंडी पौत्र ज्याचा शुकयोगि मान्य लोकीं ॥ असा पारोशर येइ तिथें तो कीं ॥ राव पाहुनि त्वरितची धांव घेई ॥ प्रधानासह तो चरणिं लीन होई ॥ १ ॥ ऋषी पूजा ती करुनि भूभुजानें ॥ अर्पि वस्त्रे भूषणे अनंदानें ॥ 'हस्त जोडुनि राव तो उभा राही ॥ हर्ष त्याचा माइना तयीं देहीं ॥२॥ पद. (भक्ति आकळिला,) या चालीवर. शंका ये मजला ॥ दयाळा ॥ शंका ये मजला ॥ ४० ॥ जन्मापासुनि दोन कुमर हे ॥ भजती शंभूला ॥ वस्त्राभरणे तया नावडे ॥ चर्चित भस्माला ॥ रुद्राक्षाच्या माळा घालति ॥ त्यागुनि रत्नाला ॥ इंद्रिय भोगहि नको तयांना ॥ घेती नामाला ॥ गज वाजी वा यानी बसणें ॥ नलगे दोघाला ॥ वैराग्याचे पुतळे दिसती ॥ आह्मां सर्वीला ॥ कोणासी ते करति न भाषण || काय करूं याला ॥ राज्य पुढे हे कैसें करतिल ॥ शंका ही मजला ॥१॥