पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३६ . संगीत शिवलीलामृत. साकी काश्मिर देशी भद्रसेन नृप मोठा पंडित होता ॥ प्रधान त्याचा परम चतुरची राजा सम जो दाता ॥ प्रजा दायाद ते ॥ ह्मणती धन्य धन्य त्याते ॥ १ ॥ सुंदर कांता मृदुभाषणि ही सूत सभाग्यचि ज्ञानी ॥ कृपावंत गुरु शिष्य कसा हो गुरुची आज्ञा मानी । क्षमावंत वक्ता ॥ चतुर सावधानचि श्रोता ॥ २ ॥ धनी उदारचि रोग कसा तो ठाउक नाहीं देहीं ॥ पूर्वदत्ते रत्ने ऐशी होतिल प्राप्तचि पाही ॥ इतकी ही त्याला ॥ होतीं अनुकुल राजाला ॥ ३ ॥ दिंडी. बहुत करितां तें अनुष्ठान पाही ॥ भद्रसेनाला एक पुत्र होई ॥ प्रधानासहि तो एक पुत्र झाला ॥ उपजतांची ते भजति शंकराला ॥ १ ॥ सुधर्मचि तें नांव त्या राजपुत्रा ॥ नाम तारक ते जाण सचिवपुत्रा ॥ नित्य पूजिति दोघेहि शंकराला । नाम इच्छिति तें, न, त्या ध्रुवपदाला ॥ २ ॥ वस्त्र भूषण दोघांस लेववीती ॥ बाळ दोघे काढुनी टाकिताती ॥ करिति धारण रुद्राक्ष सर्व देहीं ॥ श्रवण करिती मागुती शिवलिलाही ॥३॥ काय ह्मणुनी नावडे यांस कांहीं ॥ बळे घाला हो भूषणेच देहीं । असें करितां मागती काढताती ॥ सर्व वस्त्रे ब्राह्मणां अर्पिताती ॥ ४ ॥ साको. शिक्षा केली बहुत परीने नाही गुण तो आला ॥ ऐसें पाहनि राव ह्मणतसे काय करावें याला ॥ चिंता रायाला ॥ लागे तैसी सचिवाला ॥ १ ॥ दिनमणि उगवे तसाचि तेव्हां पाराशर तो आला ॥ सवें घेउनी ऋषीभार तो आला राजसभेला ॥ पाहुनि त्या ऋषिला ॥ दोघे लागति चरणाला ॥ २ ॥