पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३४ संगीत शिवलीलामृत. मुख न बघावें त्याचे, स्पर्श तरी तो कदां न हो त्याचा ॥ . यद्यपि झाला तार तो, नेम करावा सचैल स्नानाचा ॥ ५ ॥ कामदा ( या चालीवर.) शारदापती निधन पावला ॥ शिव पदीच तो जाण राहिला ॥ चिंतुनी मनी पार्वतीपती ॥ शारदा सती जाइ हो सती ॥ १ ॥ साकी शिवलीलामृत दिव्य रसायण किंवा अमृत जाण ॥ भवरोगी जे त्यांनि सेवितां नासिल रोगचि पूर्ण ॥ अंतीं शिव होती ॥ कैलासी जाउन बसती ॥ १॥ मृत्यु जयानां कवळिल त्यांना नावडेच हा सहज ॥ ज्याचे सुकृत तेजःपुंजचि सेविति हा रसराज ॥ टाळा मृत्यूला ॥ सेवुनि शिवनाम रसाला ॥ २॥ अंजनोगीत. श्रीधर वरदा गिरिजारमणा ॥ बाळकृष्ण हा नमितो चरणा ॥ देउनि सुमती भवभय हरणा ॥ कथा वदवी पुढे ॥ १॥ पद. (धांव विभो, ) या चालीवर. पाव मला गौरीहर शंकर सकळ देव तुला करिती वंदन ॥ ५० ॥ हा भव मजला भासे दुस्तर ॥ पावन कार मज शशिधर शंकर ॥ नाम तुझें तें मम मुखिं यावें ॥ कृपा अशी तूं कररे सत्वर ॥ मनिची चिंताकदूर करीरे ॥ चरणी शरण बाळकृष्ण किंकर ॥ १॥ सार्वजनिक वाचनाले खेड, (बु.)