पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय दहावा. अभंग त्यावर शारदा संगें पुत्र घेई ॥ गोकर्णा ती जाई शिवरात्रीला ॥ द्रविड देशीचा ब्राह्मण तो आला ॥ दर्शन घेण्याला शंभूचें हो ॥ परस्पर पाहुनी कष्टती अंतरीं ॥ अंतारं विचारी शारदा हो ॥ देवीचें तें वचन स्मरोनीयां मनीं ॥ वाहे नेत्री पाणी तिच्या तेव्हां ॥ साकी. उमामहेश्वरव्रत तूं केले त्याचे पुण्यचि बाई ॥ अर्धे, तैसा तुझा पुत्र ही पतीस तूं तरि देई ॥ पात जवळी राही ॥ समागम पण नको कांहीं ॥ १ ॥ - श्लोक. ( मंदाक्रांता.) यात्रा सारी करुनिहि तिनें वंदिलें प्राणनाथा ।। घ्यावा बोले स्वसुत तरि हा कां तरी किंतु आतां ॥ जें जें केलें व्रत तप तिने पुण्य अर्धेच देई ॥ ... देऊनी हो पति नगारै ती पुत्र घेऊन जाई ॥ १ ॥ आर्या. राहे व्रतस्त ती हो, पति दर्शन दुरुनि नित्य ती घेई ।। विख्यातचि पुत्र तिचा, पंडित लोकांत मान्य तो होई ॥ १ ॥ मात पित भजनि सदां, सादर तो हेच योग्य पुत्रास ॥ पार्वति माताच पिता शंकर तो, हीच भावना त्यास ॥ २॥ माता पित्यास न भजे, धिःक् त्याचे ज्ञान ते तरी जाण ॥ . धिःक् विद्या भाग्य तरी, व्यर्थचि होईल जाण थोरपण ॥ ३ ॥ स्त्रीगोत सांठवि घरी, आई बापास देउनी शणि ॥ घाली बाहिर त्यांना, अपवित्रचि तो अनामिकेहून ॥४॥