पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृन. दशरथ यागी जाउनि तो ऋषि मिळवी किर्तीला ॥ सवराष्ट्र राजस्परों मगि ती प्रसवी पुत्राला ॥ मत्स्यापासान गर्भ राहिला या, सत्यवतीला ॥ मत्स्यराज हा पुत्र जाहला मग त्या राणीला ॥ महिषी पोटी महिषासुर तो कैसा हो झाला ॥ खेतरिमण कैसा गेला रोहिणिगर्भाला ॥ चाल ॥ मुसळ कसे हो झालें सांबाला ॥ पांडव कैसे झाले कुंतीला ॥ मान असा हा ब्राह्मण वचनाला ॥ चाल || वृद्धजनांनी अशा रितीने उपदेशचि केले ॥ दुर्जन लोक परि निंदा करिती नाहिं मना आलें ॥ १ ॥ साकी मागुति झाली देववाणि ती ऐका मुर्खानो रे ॥ शारदेस जे असत्य ह्मणातिल झडेल जिव्हां ती रे ॥ ऐकुनि वाणी ती ॥ सात्विक सय सय ह्मणती ॥ १ ॥ पार दुर्जन ते निंदा कारती कापयचि हे ह्मणती ॥ अकस्मात तों जिव्हां चिरुनी त्यांत किडे हो पडती ॥ देखुनि जन ह्मणती ॥ शारदे सत्य तूं जगतीं ॥ २ ॥ अभंग. मग तीस झाला पुत्र तो सतेज ॥ शारदाऽत्मज ह्मणती तया ॥ हळू हळू वाढे द्विजराज जैसा ॥ वादूं लागे तैसा बाळक तो ॥ अष्ट वर्ष होतां व्रतबंध केला ॥ नंतर तो गेला. गुरु गृहीं ॥ चारी वेद त्याने मुखोद्गत केले ॥ शास्त्रही सगळे. पुराणें ती॥ नवग्रहीं शोभे दिनमणी जैसा ॥ शोभे तोही तैसा पंडीतांत ॥ शिवव्रतें याने बहु आचरीलीं ॥ कृपा तया केली शंकरानें ॥ १ ॥