पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय दहावा. अंजनीगीत. सांगुनि ऐसें गुप्त जाहली ॥ अंतरधानचि देवि पावली ॥ नित्य शारदा देखति जाहली ॥ स्वप्न तैसेंची ॥ १ ॥ गर्भकळा मग तिजवर आली ॥ निंदा करिती जन त्यावेळी ॥ सासुस्वशुर ऐकुनि आली ॥ घेउनि सर्वांला ॥ २ ॥ देवीची ती अघटित करणी ॥ खदखद हांसती ऐसें बोलुनी ॥ कधी भेटली देवि येउनी ॥ इजला नकळें ॥ ३ ॥ कर्णनासिका टाका कापुनी ॥ घरांतुनि द्या बाहिर घालुनी ॥ आकाशवाणि बोले गर्नुनि ॥ सत्य गर्भ शारदेचा ॥ ४ ॥ अमंगळ परी जन ते दिसती ॥ कपटचि हे हो ऐसें ह्मणती ।। वृद्ध पुण्यशिल त्यांतिल वदती ॥ ऐका ते आतां ॥ ५॥ . दिंडी ईश मायेचा काय नेम आहे ॥ खांब नसुनी आकाश कसे राहे ॥ जळावरि ही कुंभिनी कशी पोहे ॥ ग्रहण भ गणें रवि यास कोण आहे ॥१॥ सर्व देही व्यापुनी ईश राही ॥ परी त्याचा ठाव तो कुणा नाहीं ॥ पंच भूतामधिं वैर किती आहे ॥ एक रूपी चालली थोर नां हें ॥२॥ जननि गर्भी गर्भास कोण पाळी ॥ स्तनामध्ये दूध हो कोण घाली ॥ अज्ञ बाळाला ज्ञान कसे येई ॥ जगन्नाथचि तो सर्व तोच होई ॥ ३॥ पद. ( शिवाज्ञेचि वाट न पाहतां.) या चालीवर. एके काळी यूषकेतचें रेत जळी पडलें ॥ सहजी वेश्या प्राशी जळ तें नबल कसें झालें ॥धृ०॥ तेणें तिजला गर्भ राहिला पत्र प्रसव झाला ॥ विभांडकाचे रेत तसेंची एके वेळेला ॥ जळामध्ये पडले, हरिणी प्राशी हो याला ॥ , स्या हरिणीला ऋष्यश्रृंग तो पुत्र किं हो झाला ॥ . .