पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. दिंडी. ऐक विप्रा सांगते सर्व कांहीं ॥ पूर्व जन्मी कोण ही होति तें ही ॥ . द्रविडदेशी पूर्वि ही विप्रकन्या । इच्या रूपा पाहुनी वदति धन्या ॥ १॥ स्त्रिया दोघी पतिस हो इच्या होत्या ॥ कलह करिती अपसांत निस हो या॥ धाकटीही रुपवान अशी होती ॥ मधुर बोलोनी घेइ पती हातीं ॥ २ ॥ पद. ( थोर तुझे उपकार ) या चालीवर. काय पुढे झालें ॥ ऐका काय पुढे झालें ॥ शेजारी तो एक जारचि ॥ होता त्या वेळें ॥ ईस पाहुनी मोहित झाला ॥ एकांती हो धरिलें ॥ इने करोनी नेत्र अरक्तचि ॥ लोटुनि त्या दिधलें ॥ खेदयुक्त तो होउनि गेला ॥ गृहास त्या वेळे ॥ इच्या ध्यासें झुरुनी झुरुनी ॥ मरण तया आलें ॥ विधवा हो तूं ह्मणनि सवतिनें ॥ इजला हो शापिलें || दोघीला ही कालेकरुनी ॥ मृत्युनें गाठिले ॥ भामिनि जी ती मत्यु पावली ॥ शारदा ह्या वेळें ॥ पद्मनाभ तो जार पूर्विचा ॥ त्याने हिला वरिलें ॥ पूर्व जन्मिचा दावा ह्मणुनी ॥ वैधव्य तें दिधलें ॥ १ ॥ साको. पूर्व जन्मिचा इचा पती. तो द्रविड देशिं बा आहे ॥ स्त्रीहीनं इचे रूप आठवुनि तळमळ अंतरीं साहे ॥ आहे दूर वरी । तिनशे साठ योजन तरी ॥ १ ॥ स्वप्नामध्ये नित्य येउनी भोगिल तो वा इजला ॥ जागृतिहुनही विशेष सुख तें होइल ह्या दोघाला || होइल पुत्र इला ॥ शारदानंद नाम त्याला ॥ २ ॥