पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय दहावा. १२९ श्लोक. ( इंद्रवज्रा.) झाला रवी अस्त करीत ध्यान ॥ झाली असे रात्रहि याम दोन ॥ आली भवानी मग त्याच ठायीं ॥ देते वराला वर माग बाई ॥ १ ॥ कामदा, ( या चालीवर.) अमित तेज ते नयनि देखुनी ॥ ऋषिस नेत्र हो येत ते क्षणीं ॥ प्रेमयुक्त ते चरणिं लागती ॥ स्तवन देविचें कारति मागुती ॥ १ ॥ पद. . . देवी जगदंबे ॥ अंबे ॥ धृ०॥ चिद्विलासिनी मुळप्रकृती प्राणव स्वयंभे अंबे ॥ ब्रह्मानंददायिनी माते सौभाग्यसरिते अंबे ॥ धराधरेंद्रनंदिनि माते सर्वारंभे अंबे ॥ चिन्मय सुख तें भक्तां मिळतें तुज पासुनि गे अंबे ॥ वेद पुराणी वंद्य तरी तूं हेरंबजननी अंबे ॥ अंध पाहती पांगुळ धावति कृपा तुझी ही अंबे ॥ वाचाळ मुके मुर्ख हि पंडित सिकता रने अंबे ॥ भवभयहारक भक्तपालके मनोल्हासिनी अंबे ॥ ब्रह्मादिक ही ध्यानीं वेधले त्रिभुवनजननी अंबे ॥ वेदमाते द्विजवर नंदिनी त्रिपुरसुंदरी अंबे ॥ त्रिकाळ ध्याती ते जन होती त्रिदेहविरहित अंबे ॥ . शिवमानससरमराळीका तूं सर्व व्यापके अंबे ॥ सकळ कल्याण तोष दायिके शारदा नमी अंबे ॥ १ ॥ साकी ऐसें ऐकुनि प्रसन्न देवी माग ह्मणे वरदान ॥ शारदावृत्त सर्व कळवुनी नैध्रुव धरितो चरण ॥ अंबे सत्य करी ।। दासाचे वचन तें तरी ॥ १ ॥