पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२८ संगीत शिवलीलामृत. श्लोक (स्रग्धरा.) केशानी गुच्छ मोठा बनि हि मज तो सागराकार भासे ॥ केसांचा वर्ण काळा कुरळचि दिसती शोभती ते हि कैसे ॥ जैसी बाहे रखीचीप्रियकरतनया भास तैसाच होई ॥ पाहोनी शुभ्र हारा मम मन समजे काय गंगाच वाही ॥१॥ - साकी. हारामध्ये अरक्त कमलें बघतां नयनी दिसती ॥ पद्यजनंदिनि गुप्त तरी ती त्रिवेणि सम वेणी ती ॥ करितां स्नान तरी ॥ प्राण्या मुक्ती तीच खरी ॥ १ ॥ ... पद पद. (जाउं नकारे विषया, ) या चालीवर. तिणे गुंफिली देहा भोंवति ब्रह्मांडे सारी ॥ ती समजा की मोहनमालचि अंबे मज तारी ॥ ५० ॥ जिव शिव दोन्ही स्तन ते दोनचि धरती पक्षाला ॥ सौभाग्या त्या क्षय नाहीं हो ह्मणुनि वदति त्याला ॥ .. वज्रचुडेमंडितकर ह्मणती नमा भवानीला ॥ दशांगली त्या घालि मद्रिका दशावताराला ॥ पायीं नेपुर पैंजण वाजति शंभु समाधीला ॥ विसरुन सेवी नेत्र चकोरें त्या मुखचंद्राला ॥ चाल ॥ भक्ति पाहुनी पावे भक्ताला ॥ करुनी जोडवी बांधी चरणाला ॥ धन्यताच येई ऐशा भक्ताला ॥ चाल ॥ ऐसें स्वरूप ध्यात शारदा झालें सुख भारी ॥ अकराशत दंपत्य पूजुनी ह्मणे मला तारी ॥ १ ॥ . .