पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय दहावा.. आदि दवि ही जगन्माता झाली मग हासती ।। तो रंग शुभ्र दिसे मागुती ॥ हंस पंक्तिसम हसतां सारे दंत तिचे झळकती ॥ अधर ते रक्त वर्ण दीसती ॥ पक्क बिजें ती डाळिंबीची जैशी बहु शोभतीं ॥ तैसे दंत तिचे भासती ॥ इंद्रनीळसम कंठीचे ते मुक्तहार शोभती ॥ श्यामलांग प्रभा माधं बिंबती ।। कमंडलुसम सुंदर दिसती पयोधर ते अती ।। ज्यांतिल सुरगण अमृत प्राशिती ॥ चाल ॥ चपळा गाळुनि रंगविलें अंबर तरी ॥ मुक्तलग कंचुकी प्रभाकर वाहूवरी । इंद्रनीळ वर्णी लीला वेषा धरी ।। चाल ।। प्रळयरूपिणी आदिजननि ही भक्ताला पावती ।। माये वार्णतां थकली मती ॥ १ ॥ .. दिंडी. आदि पुरुषाची ज्ञान कळा पाही ॥ घडी मोडी ब्रह्मांड वेळ नाहीं ॥ जिचे रूपा पाहुनी जाश्वनीळ ॥ मनी बोले या रुपा नाहिं मोल ॥ १ ॥ कृत्तिकेचा पंज तो गगनिं जैसा || जलजघोषाहि डोलतो कार्ण तैसा ॥ अरुणसंध्यारागास उणे आणी ॥ कुंकुमाची रेष ती मनी जाणी ॥ २ ॥ सगुणपण ते टाकुनी शंभु पाही ॥ प्रळय काळी निगूण असा होई ॥ परी सौभाग्यहि तिचे गहन फार ॥ कुंकुमाचा महिमाच बहू थोर ॥ ३ ॥ भवानीने शंभूस दोन वेळा ॥ वरुनि लावीती बिजवरा कपाळा ॥ वदनचंद्रा उपमाच जिच्या नाहीं ॥ वर्णनाला चाले न मती कांहीं ॥ ४ ॥ श्लोक ( भुजंग प्रयात.) प्रयागी त्रिवेणी जसी शोभती हो ॥ तशी वेणि शोभे भवानी तुझी हो ।। | अलंकार ते मच्छ कच्छादि कैसे ॥ नदीतील त्या मच्छची काय भासे ॥ १॥