पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ संगीत शिवलीखामृत. मणिमय कुंडल कैशी कर्णी तक्षक शेषचि दिसती ॥ ब्रह्मानंदा मनी स्मरूनी ओतिलि शिव मूर्ती ती ॥ भ्यान भवानीचें ॥ आतां करिगे तूं साचे ॥ २॥ पद. (बघुनी उपवना, ) या चाळीवर . . वाला तन्वंगी सुंदर ती बैसे अंकावरीं ॥ शंभूच्या त्या, नित्य धरी जो पाशांकुशही करीं ॥. बकुळ मल्लिका सुरतरु सुमने यांच्या माळा वरी ॥ इभयुक्त अवतंस डोलतही शोभा बहुतचि तरी ॥ हरिमध्या ती भुजंग वेणी मुख ते कमलापरी ॥ द्वादशादित्य शोभा जघनी झळके कांचीवरी ॥ पदनखतेजा पाहुन जीच्या लाजति त्या सुंदरी ॥ अंगींचा तो सवास जाई ब्रह्मांडाच्या वरी ॥ कोटिमदनसम तेज विराजे शोभा बहु साजिरी ॥ पदमुद्रा त्या जेथें उमटति उगवतिं कमळे तरी ॥ दंततेज ते क्षितिवरि पडतां खडे मण्याचे परी ॥ ब्रह्मांडामाधि कोण अशी हो आहे ती सुंदरी ।। चंद्र सर्य जे प्रकाश देती तिच्याच तेजावरी ॥ चाल | शक्रादिक बाळें गर्मी पाळण करी ॥ त्रिभुवन सारेही खेळवि नानापरी ॥ निगमागम ध्याती नित्य जिला अंतरीं ॥ चाल ॥ त्रिभुवन जननी त्रिपुरसुंदरी कृपा दिनावर करी ॥ १॥ पद. (श्रीसांवाच्या समान दैवत, ) या चालीवर. बिंबाधर अति आरक्तचि तें तेज जयाचें अती ॥ वर्णाया नच चाले मन्मती ॥ ५० ॥ मासिकेवरी मुक्त डोलती प्रवाळ सम भासती ॥ नेत्रांजनें गुंजे सम दीसती ॥