पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ संगीत शिवलीलामृत. दगड असुनी हो तया देव केलें ॥ मंत्रसामर्थ्य नवल तरी झालें ॥ वाळलेल्या काष्ठास पर्ण आलें ॥ ब्रह्म सारें मोडुनी पुन्हां केलें ॥ ३ ॥ ह्मणुनि ब्राह्मण थोर हो तिन्ही लोकीं ॥ ह्मणुनि त्यांना मान तो फार द्या की। शारदे तूं ऐकगे गोष्ट माझी ॥ उमामहेश तूं निय तरी पूजी ॥ ४ ॥ साकी. मंत्र षडाक्षर निय जपावा भाव ठेवुनी चित्तीं ॥ या नियमाने नित्य राहुनी पूर्णाचे पूजा कर ती ॥ ऐसे बोलोनी ॥ राही तगृहिं मठ करुनी ॥ १ ॥ श्लोक आरंभ याला कर चैत्रमासीं ॥ किंवा करावा मग मार्गशीर्षी ॥ शुद्धांत गे अष्टमि सोमवारी ॥ पाहोनि पूजी मदनांतकारी ॥ १ ॥ दिंडी. नाहि तर तो आरंभ करी बाई ॥ चतुर्दशीस गे फार पुण्य होई ॥ एक संवत्सर नेम ठेवि बाई ॥ षडाक्षर तो मग मंत्र तीस देई ।। १ ॥ पद. (भला जन्म हा,) या चालीयर शिव मंदिर तें दिव्य करूनी शुभवितान त्यावरी ॥ चारि स्तंभ भूषित मग ते करी ॥ ७० ॥ सुवास सुमनें अष्टगंध ही रंगित माळा वरी ॥ षोडश वर्ण यंत्र नाना परी ॥ अष्टदळे. ती चतुर दळेही तांदुळ वर घालुनी ॥ शोभा आणी घट स्थापुनी ॥ उमामहेश प्रतिमा दोन्ही सुवर्णाच्या करी ॥ स्थापी मग त्या मध्यंतरीं ॥ निष्ठा धरुनी उमामहेशा पूजी नित्यचि तरी ॥ .. षोडशोपचार घेऊनि करीं ॥ -