पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१३०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय दहावा. १२३ आसन सत्वर देउनि त्याला पूजी त्यातें भावें ॥ नमस्कार मग करी ऋषीला बोले वरिवरि यावे ॥ ह्या मम सदनाला ॥ आहे सादर सेवेला ॥ २ ॥ विप्रा न दिसे केवळ अंधचि आशिर्वाद तो वदला ॥ सौभाग्य तुझें अपार वाढो होवो पुत्रचि तुजला ॥ . ऐकुनि ती सांगे ॥ घडली गोष्टचि जी मागें ॥ ३ ॥ माझ्या जिव्हे बाहिर आले असत्य कैसे होई ॥ अघटित तेंची घडविन आतां अनुभव याचा पाही ॥ अशक्य होणे हे ॥ काय तरी हो वदतां हें ॥ ४ ॥ पद. ( दिसली पुनरपि, ) या चालीवर. ऋषिची वचनें असत्य कशि बा ऐका थोरवि त्याचि तरी रंकाचा तो सहस्रनेत्रही वचन तयाचे क्षणे करी ॥ शापबळाने राजा नहुषही सर्पचि केला त्यास तरी ॥ यादवकल तें भस्मचि झालें भीती ज्यांना विधी हरी || सागारं तरि ती बुडून गेली शक्र संपती हो सारी ॥ विष्णूला ही अंबऋषीचा घ्यावा लागे जन्म तरी ॥ राव परिक्षिती भस्म जाहला होता जपुनी फार जरी ॥ स्त्रिया असनी पांडूला तो भोग मिळेना जन्मवरी ॥ जमदग्नीचा क्रोध कठिणची चौघे पुत्रचि भस्म करी ॥ साठसहस्र ते सगर जळाले ब्रह्मशाप तो याच परी ॥१॥ दिंडी. कुबेर तनय ते वृक्ष कसे झाले ॥ दंडकाला कोणिहो भस्म केलें ॥ सरडरूपी नगराज कसा झाला ॥ अत्रिनंदन रोगि हो कुणी केला ॥१॥ सकळ देवाचा इंद्र देव पाही ॥ परी कैसी हो भगें तया देहीं ॥ । सूर्यनंदन तो दासिपुत्र केला ॥ उदाधे सारा कोरडा कुणी केला ॥ २ ॥ साजनक लाचनालय