पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ संगीत शिवलीलामृत, एक दिवशी जाइ तो नदीतीरीं ॥ करुनि संध्याही ब्रह्मकर्म सारी ॥ गृही येतां झोंबला व्याल पायीं ॥ प्राण जाउनि तत्काल पडे ठायीं ॥२॥ हाक झाली नगरांत शीघ्र जेव्हां ॥ शारदाही धावुनी आलि तेव्हां ॥ गतप्राणहि देखुनी प्राणनाथा ॥ ह्मणे आतां कायहो करूं ताता ॥ ३ ॥ पद. ( नकळे हाइल गति कैशी, ) या चालविर. पतिविण राहूं मी कैशी ॥ झाले व्यर्थ परी ॥ धृ०॥ सोडुनि गेले मम पतिराज ॥ आज बुडालें माझें जहाज || मजवर कां कोपे गिरिराज ॥ याचें काज काय तरी ॥ सांगू गुज तें कोणा माय || ओस पडली मम शेजची हाय ।। सर्प रूपी तो तस्कर काय ॥ लुटली गाय त्याने खरी ॥ वस्त्राभरणे नलगे फार ॥ झाला माझ्या देही भार ॥ देवा शंभो दुःख निवार ॥ टाकी शृंगार दूर वरी ॥ १ ॥ अंजनीगीत करुणा ऐशी ऐकुनि श्रवणीं ॥ अश्रू येती त्या जन नयनी ॥ ह्मणती देवा कैशी करणी ॥ कोलि तुवा शंभो ॥ १ ॥ विप्राचे मग दहनचि केलें ॥ शारदेसह ते परतचि आले ॥ बहुत दुःख तें जननिस झालें ॥ पाहुनि शारदेला ॥ २॥ बहुत दिवस ते गेले या परी ॥ घरची कार्या जात बाहिरी ॥ एकटि शारदा होति मंदिरीं ॥ अपूर्व तो घडलें ॥ ३ ॥ साकी नैध्रुव नामें ऋषीश्वर तो बहुत वृद्धची होता ॥ .. नेत्र हीन तो शिष्य घेउनी आला फिरता फिरतां ॥ शारदा सदनाला ॥ उर्जित काळ तिचा आला ॥ १.