पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मंगीत शिवलीलामृत. बोल ऐकनि अनताप तया झाला || कंठ न्याचा फारची भकाने आला ॥ पाग सखये देइ तो मंत्र माते । पठण करितां ज्या पाप भस्म होते ॥ ६ ॥ अभंग. प्राणनाथ माझे कांता भी तुमची ॥ दासि या पायाची बलभारे ॥ नाही आधिकार सांगाया मजला ॥ शिष्य कां गुरूला ज्ञान देती ॥ यादव कुळींचा गुरू तो विख्यात ॥ ब्रह्मज्ञानी रत गगमनी ॥ नप श्रेष्ठा तया शरण जाऊनी । गुरू तो करूनी दीक्षा घेइ ॥ १ ॥ ऐकुनिया बोला नप तो निघाला ।। गाश्रमी आला कांतेसह ।। साष्टांग नमूनी लागे गुरु पायीं ॥ ह्मणे दीक्षा देई गुरु राया ॥ देवनी तयाचा भाव तो अंतरीं ।। जात यमुना तीरी तयासह ॥ जाउनिया तथै स्नानै हो करीती ॥ भक्तीनें पूजिती शंकराला ।। २ ॥ साकी. अभिषेक मग करुनि मुनीला पूजन त्यांचे केलें ॥ अगणित धनही आणुनि रायें गुरुसी अर्पण केलें ॥ लीन होऊनी ।। लागे तो मग गरु चरणीं ॥ १ ॥ पद. ( जाउ नकारे विषया. ) या चालीवर. दारिद्राने गुरू त्रासला भोगित दुःखाला ॥ त्याचा शिष्या धनिक असूनी न करि उपायाला ॥ विद्या शिकुनी व्यर्थचि त्याची, कुबुद्धि रत झाला ।। पापी किंवा काय ह्मणावें ऐशा प्राण्याला । दाशाह राजा तसा न हो लीनाच चरणाला ॥ १ ॥ पद. ( श्रीहरिच्या वेणु नादें, ) या चालीवर भक्तीने पाहुनीया द्रव आला त्यास तो ॥ हृदयीं की धरुनि त्याला ममतेने बोलतो ॥ उपदेशा योग्य होसी घेई रे मंत्र तो ॥ जपतां तुं पूत होसी जो पापा जाळितो || १ ॥