पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.. अध्याय दहावा. १२१ अध्याय १० वा. श्लोक रमारमण ही तुझें सतत बा करी ध्यानरे ॥ मुनीजनहिं मानसीं सतत बा तुला ध्यातिरे ॥ उमारमण शंकरा सतत मी पदीं लीनरे ॥ · कुबुद्धि मनिं या वसे दहन ती करी शंभुरे ॥ १ ॥ .. अंजनीगीत काम गजाला अंकुश तरि तूं ॥ क्रोध जळाला विध्वंसक तूं ॥ मद तम हरता सूर्य तरी तूं ॥ वृषभध्वजारे ॥ १॥ मत्सरदुर्धरविपिन जाळशी ॥ दंभनगाते छेदुन टाकिशी ॥ धर्मवर्धना साठी येशी ॥ वरि वरि तूं भूवरी ॥ २ ॥ कैलासावरि विहार करिशी ॥ निगमागमही वंदिति तुजशी ॥ दयानिधे बा तव चरणांशीं ॥ सुर वसती सर्व ही ॥ ३ ॥ साकी. नवमाध्यायी शबरासह तो सिंहकेत ही तरला ॥ कथा तरी ती यथामतीने केली श्रुत तुझांला ॥ पुढे सूत वदती ॥ सांगिन तुह्मांस कथा ती ॥ १ ॥ अनर्त देशी विप्र वेदरथ वैदिक ब्राह्मण होता ॥ त्याची कन्या नाम शारदा जिच्या स्वरुपा पहातां ॥ तटस्थ जन सारे ॥ ह्मणती धन्य विधातारे ॥ २॥ द्वादश वर्षे तिच्या वयाला जेव्हां पूर्णचि झाली ॥ तिच्या पित्याने पद्मनाभ या विप्राला ती दिधली करुनि संभ्रम तो ॥ कन्यादानचि तो करितो ॥३॥ . दिंडी..... तोहि ब्राह्मण विद्वान फार होता ॥ मान देती सर्वही गृहीं जातां ॥ श्वशुर विनवी ह्मणुनि तो तिथे राही । पुढे होणारे काहिं कळत नाहीं ॥१॥