पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

. अध्याय. नववा.. निष्ठा मनिं ती जरी वसेना ॥ पिनाकपाणी कधी वळेना ॥ तोच मार्ग तरि मुख्यचिः जाणा ॥ शिवपद प्राप्तीला ॥ ३ ॥ पद. (रुचती का तीर्थ यात्रा, ) या चालीवर. ण्याला छंद लागे शिक्नामी रंगलाः ॥ शिवलीला नित्य गायी भजनीं तो लागला ॥ शिवरात्री सोमवारी पूजी त्या शंभुलाः ॥ धन देई ब्राह्मणांना शिवनामी वेधला ॥ १ ॥ साकी. ऐसें करितां भजन शिवाचे शिव रूपी तो झाला ॥ शिव पार्दै मग तो जाउनि राहे त्याचा फेरा चुकला ॥ शिव शिव तार बोला ॥ फेरा तुमचा मग चुकला ॥१॥ पद. ( जाउं नकारे विषया, ) या चालीवर. शिवलीलामृत मंडप मोठा त्याच्या खाली ही ॥ श्रधिर वाणी वल्ली सम ती पसरुनि हो राही ॥ धु० ॥ अहळ बहळ ती पसरुन गेली वर वर ती वाढती ॥ सघन शीतल छाया पाहुनि भक्त तिथे बैसती ।। प्रेम हींच हो द्राक्ष फळे ती पक्व बहुत भक्षिती ॥ त्या वल्लीची कृपाफळे हो मिळोत मजलाही ॥ १ ॥ अंजनीगीत मृडानि हृदया शशीशेखरा ॥ ब्रह्मानंदा शिवा श्रीधरा ॥ लीला वदवी तुझी उदारा ॥ या दास मुखीं रे ॥ १॥